मुंबई

प्रचारसमाप्तीनंतर निवडणूक जाहिरातींना बंदी

CD

प्रचार समाप्तीनंतर निवडणूक जाहिरातींना बंदी
राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा प्रचार १३ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता संपेल. त्यानंतर कोणतीही निवडणूकविषयक जाहिरात टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्रे किंवा इतर माध्यमांतून प्रसारित करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. त्यात सचिव सुरेश काकाणी आणि विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वाघमारे म्हणाले, की मतदान १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. कायद्यानुसार मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार थांबवावा लागेल. त्यामुळे १३ जानेवारीपासून कोणतीही जाहिरात किंवा प्रचार करता येणार नाही. यासंदर्भातील सर्व नियम ‘प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश २०२५’मध्ये नमूद आहेत.

काकाणी यांनी सांगितले, की उमेदवाराचे नाव त्या महापालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. प्रस्तावक आणि अनुमोदक हे उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढतो त्याच प्रभागातील मतदार असणे बंधनकारक आहे. प्रत्येक उमेदवाराला एक प्रस्तावक आणि एक अनुमोदक आवश्यक असतो. उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागात नामनिर्देशनपत्र भरू शकतो; पण शेवटी एका प्रभागातील एका जागेसाठीच निवडणूक लढविता येते. एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे भरता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : मोठा दिलासा ! जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती उतरल्या, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्ध संपविण्याचे संकेत

Jayant Patil: राज्य कर्जाच्या विळख्यात: आमदार जयंत पाटील यांचा सरकारवर घणाघात, घोषणांचा पाऊस आणि तरतुदींचा दुष्काळ!

Relief From Dangerous Potholes in Beed : सात वर्षांच्या संघर्षानंतर धानोरा रस्त्याला नवा श्वास; दोन टप्पे पूर्ण!

Satara Bribery Case: प्राध्‍यापक पदोन्नतीसाठी खटावमध्ये लाचखोरी; लाखोंच्‍या राेकडसह दाेन लोकसेवक ताब्यात, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

सोलापुरातील ‘या’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोलापूरचा लळा! कलेक्टर, सीपी, ॲडशनल एसपींचा कार्यकाळ पूर्ण; ५ अधिकाऱ्यांचाही कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार, वाचा...

SCROLL FOR NEXT