दोन ठाकरेंच्या युतीत एबी फॉर्मवरून ठिणगी
महापालिका निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आल्याने राजकीय गणिते बदलली असली तरी जागावाटप आणि एबी फॉर्म वाटपावरून दोन्ही पक्षांत काही ठिकाणी नाराजी आहे.
आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत शिवसेनेला (ठाकरे) मोठा धक्का बसला आहे. गेल्या १७ वर्षांपासून पक्षाचे एकनिष्ठ असलेले वरळी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘युतीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्या कष्टाची किंमत राहिलेली नाही,’ असा आरोप करीत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोळी यांचा राजीनामा म्हणजे वरळीतील कोळीवाडा आणि स्थानिक मतांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भांडुपमध्येही मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपावरून जुंपली आहे. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला, तरी काही माजी नगरसेवक अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.
...
पेडणेकर यांचे नाव नाही!
शिवसेना (ठाकरे) पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली असून, त्यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वरळी किंवा भायखळा यासारख्या मतदारसंघांतून त्या निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या; मात्र पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने त्या नाराज असल्याचे कळते.
...
स्नेहल जाधव यांचा राजीनामा
मनसेच्या वरिष्ठ नेत्या आणि पक्षाच्या सरचिटणीस स्नेहल सुधीर जाधव यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. प्रभाग क्रमांक १९२च्या उमेदवारीवरून त्यांना विश्वासात न घेतल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. स्नेहल जाधव आणि त्यांचे पती सुधीर जाधव यांनी १९९७ ते २०१७ या काळात सलग चार वेळा नगरसेवक म्हणून या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र आगामी निवडणुकीच्या उमेदवारी प्रक्रियेतून त्यांना बाजूला ठेवण्यात आल्याने त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘इतकी वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही महत्त्वाच्या निर्णयात डावलले गेल्याने मी राजीनामा देत आहे,’ असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दादर-माहीम परिसरात मनसेला मोठे खिंडार पडल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.