मुंबई

कांदिवलीत आरएमसी प्लांटचा रहिवाशांना मनस्ताप

CD

कांदिवलीत आरएमसी प्लांटचा रहिवाशांना मनस्ताप
सोसायट्यांमधील रहिवाशांची कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : कांदिवली पश्चिमेतील येथील डॉ. नरवणे मार्ग (एम. जी. रोडजवळ) परिसरात सुरू असलेल्या विकसकांच्या आरएमसी प्लांटमुळे स्थानिक रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या प्लांटमुळे परिसरातील धीरज प्रेसिडेन्सी, रिद्धी-सिद्धी, जय श्रीकृष्ण यांसह अनेक सोसायट्या, रुग्णालये आणि शाळेतील विद्यार्थी त्रस्त असून रहिवाशांनी आता प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्‍याचे रहिवाशांनी सांगितले.
स्थानिक सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, विकसकाने स्वतःच्या प्रकल्पासाठी आरएमसी प्लांट उभारला होता; मात्र प्रत्यक्षात हा प्लांट व्यावसायिक कामासाठी वापरला जात असून, दिवसा-रात्री कधीही इथून आरएमसी टँकर्सची मोठी वाहतूक सुरू असते. यावर आक्षेप घेताना रहिवाशांनी सांगितले, की हा प्लांट अहोरात्र सुरू असल्याने मोठमोठे टँकर्स, डम्पर्स आणि लॉरीजची वर्दळ असते. रात्रीच्या वेळी टँकर्सचे हॉर्न आणि रिव्हर्स गिअरच्या अलार्ममुळे रहिवाशांची झोप उडाली आहे.
अरुंद रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे परिसरात प्रचंड धूळ उडते. हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. परिसरातील रुग्‍णालयांमधील रुग्णांना या आवाजाचा आणि प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे.
आरएमसी प्लांटमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे. नरवणे शाळेतील शेकडो विद्यार्थी याच मार्गावरून ये-जा करतात. टँकरची बेदरकार ड्रायव्हिंग आणि अरुंद रस्ता यामुळे अपघाताची टांगती तलवार कायम आहे. तसेच जलशुद्धीकरणाचे नियम धाब्यावर बसवून प्लांटमधील सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याचेही रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले आहे.
आम्ही केवळ प्रशासकीय कर्तव्याची जाणीव करून देत आहोत. या अनधिकृत व्यावसायिक वापरामुळे सामान्य माणसाचा जीव धोक्यात येत असेल, तर संबंधित यंत्रणांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा त्रास थांबवावा, अशी मागणी धीरज प्रेसिडेन्सी व इतर सोसायट्यांच्या रहिवाशांनी केली आहे.

या सोसायट्यांना त्रास
या गंभीर विषयावर धीरज प्रेसिडेन्सी, हर्षली, सखी, माधवकुंज आणि शिवशक्ती एसआरए यांसारख्या सोसायट्यांनी महापालिका आणि स्थानिक पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने रहिवाशांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: रेल्वेच्या अभियंत्यांना दिलासा! मुंब्रा लोकल अपघात प्रकरणी अटक केली जाणार नाही

BMC Election: मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही! भाजप नेत्याच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय संताप

Malegaon Municipal Election : बोटावरची शाई आता इतिहासजमा! मालेगाव महापालिका निवडणुकीत वापरले जाणार १५०० मार्कर पेन

बाबो! पुण्याच्या रस्त्यावर धावली दुबईची ‘Polaris Slingshot R’, कार पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी, viral video

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये

SCROLL FOR NEXT