मुंबई

किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा!

CD

किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा!
आमदार नीलेश राणे यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : कोविड काळात खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या ठाकरे गटाच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी केली आहे. पेडणेकर यांनी उमेदवारी अर्जात गुन्ह्यांची माहिती लपवली असून त्याविरोधात कायदेशीर लढाईचे संकेत आमदार राणे यांनी दिले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार राणे म्हणाले, की महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १९९ मधील ठाकरे गटाच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांच्यावर २०२३ मध्ये दोन फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्या आता जामिनावर बाहेर आहेत; मात्र पेडणेकर यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्जात ही माहिती लपवली आहे. पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती; मात्र त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना धमकी देऊन त्यांनी उमेदवारी मिळवली. कोविडमधील सगळं बाहेर काढेन, असे ठाकरेंना सांगून ब्लॅकमेल केले आणि तिकीट मिळवले, असे आमदार राणे म्हणाले. एक गुन्हा बॉडी बॅग घोटाळ्याचा आहे. दुसरा गुन्हा एसआरए प्रकल्पासंदर्भात झालेला आहे, असे त्यांनी सांगितले. पेडणेकर यांनी निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडावे. याप्रकरणी पेडणेकर १०० टक्के अपात्र ठरतील. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असे आमदार राणे म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे मुंबईत इतकी वर्षे सत्तेत असताना कोणती विकासकामे केली, हे त्यांनी सांगावीत, असेही राणे म्हणाले. राज ठाकरेंकडून चांगल्या विषयाची अपेक्षा होती; मात्र त्यांचे विचार पाहून ती फोल ठरली, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : बीडच्या ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला न्याय; आंदोलनानंतर कारखान्याकडून २१ लाखांची मदत

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT