मुंबई

पाचशे विद्यार्थ्यांमागे एका समुपदेशकाची गरज

CD

पाचशे विद्यार्थ्यांमागे एका समुपदेशकाची गरज
विद्यार्थ्यांमधील तणावामुळे यूजीसीची सूचना

मुंबई, ता. १८ ः विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा मोठ्या मानसिक तणाव आणि कल्याणाशी संबंधित समस्यांचा केवळ दिसणारा भाग असल्याचे निरीक्षण नोंदवत, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) एका समितीने विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सुविधा मजबूत करण्यासाठी समुपदेशक आणि विद्यार्थी यांचे विशिष्ट प्रमाण सुचवले आहे. यात मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्येक ५०० विद्यार्थ्यांमागे एक समुपदेशक, तर लहान संस्थांमध्ये प्रत्येक १०० विद्यार्थ्यांमागे एक समुपदेशक आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.
देशातील उच्च शिक्षण संस्थांसाठी मानसिक आरोग्य व कल्याणविषयक एकसमान धोरणावरील यूजीसीने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार समुपदेशकांची संख्या आणि त्यासोबतच नियमित जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, न्यायालयात झालेल्या एका सुनावणीदरम्यान, सर्व उच्च शिक्षण संस्थांना एखाद्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची किंवा अनैसर्गिक मृत्यूची घटना घडल्यास, त्या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिस यंत्रणेला कळवण्याचे निर्देश दिले. तसेच या संस्था एकूणच सुरक्षित, न्याय्य, सर्वसमावेशक आणि शिक्षणासाठी अनुकूल वातावरण असाव्यात, ही मूलभूत जबाबदारी टाळता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केल्याने यावर उच्च शिक्षण विभागाकडून अधिकची खबरदारी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
...
मानसिक स्वास्थ्याची काळजी
मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय कार्यदल (एनटीएफ) स्थापन केला होता. महाविद्यालयांची जबाबदारी केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेपुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने तेव्हा नमूद केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT