मुंबई

६० वर्षीय रिक्षाचालकाचा यशस्वी हृदय प्रत्यारोपण

CD

६० वर्षीय रिक्षाचालकावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण
रुग्णाचा पुन्हा कामावर परतण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पवई येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयात ६० वर्षीय ऑटो रिक्षाचालकावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. कार्डिओव्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जरी व हृदय प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
शेवटच्या टप्प्यातील हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या या रुग्णाची हृदय कार्यक्षमता (एलव्हीईएफ) केवळ १० टक्के होती. त्याची प्रकृती सातत्याने खालावत होती. हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता लक्षात घेऊन कार्डिओलॉजी संचालक डॉ. ए. व्ही. गणेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा निर्णय घेतला. त्यानंतर कार्डिओव्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जरी व हृदय प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या टीममध्ये कार्डिओलॉजिस्ट, अ‍ॅनेस्थेटिस्ट, क्रिटिकल केअर तज्ज्ञ, परफ्युजनिस्ट, इम्युनोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट तसेच सहाय्यक कर्मचारी सहभागी होते. दरम्यान, यशस्वी प्रत्यारोपणानंतर सावरणाऱ्या या रिक्षाचालकाने पुन्हा कामावर परतण्याचा निर्धार व्यक्त केल्याने हा निर्णय हृदयरुग्णांसाठी नवी आशा निर्माण करणारा ठरत आहे.
शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना डॉ. प्रवीण कुलकर्णी म्हणाले, की इस्केमियाचा कमी कालावधी आणि पेरीऑपरेटिव्ह आयसीयू सोयीमुळे चांगला परिणाम साधता आले. झोनल ट्रान्स्प्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (झेडटीसीसी) मार्फत दात्याचे हृदय उपलब्ध झाले. दात्याच्या कुटुंबीयांच्या उदार निर्णयामुळे रुग्णाला आयुष्याची दुसरी संधी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामललाच्या दर्शनाची वेळ आणि नियम अचानक बदलले; आता VIP पास सुद्धा बंद, काय आहे कारण?

'मराठी सिनेमासाठी काय करतोय?' विलासराव देशमुखांनी रितेशला विचारलेला प्रश्न, वडिलांची इच्छा सांगताना म्हणाला...'सध्या मराठी भाषेला..'

Chakan News : काळ्या ऑइलवरील शेगड्यांकडे कल; चाकण परिसरामधील छोट्या हॉटेलचालकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT