मुंबई

‘त्या’ मद्यपी चालकांना तातडीने निलंबित करा

CD

परळ एसटी विश्रांतिगृहात
आढळल्या मद्याच्या बाटल्या

मद्यपी चालकांच्या निलंबनाचे परिवहनमंत्र्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक आणि इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान रविवारी (ता. २५) चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांत दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. तसेच काही कर्मचाऱ्यांनी मद्यपान केल्याची दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले.
या कर्मचाऱ्यातील एक जण साताऱ्याचा असल्याचे सांगण्यात आले. या वेळी सरनाईक म्हणाले, की परगावी कर्तव्य बजावणाऱ्या चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र, अशा ठिकाणी मद्यपानासारखे निंदनीय कृत्य घडत असतील तर ते केवळ शिस्तभंग नाही, तर प्रवाशांच्या जिवाशी थेट खेळ करणारे अत्यंत धोकादायक कृत्य आहे. मद्यपान करून कर्तव्यावर जाणारा कर्मचारी केवळ अपघाताला निमंत्रण देत नाही, तर एसटीच्या सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना चौकशीअंती सेवेतून बडतर्फ केले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.
...
चाचणी अनिवार्य
यापुढे कर्तव्यावर जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची, विशेषतः चालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे चाचणी अनिवार्य करण्यात यावी, असे सांगत चाचणीत दोष आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेशही मंत्री सरनाईक यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT