मुंबई

अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी

CD

अवजड वाहनांना
मुंबईत प्रवेशबंदी
आजपासून नवी वाहतूक नियमावली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी १ फेब्रुवारीपासून शहरात नवी वाहतूक नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अवजड वाहनांच्या मुंबईतील प्रवेशावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
नव्या आदेशानुसार, सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. दक्षिण मुंबईत तर सकाळी ७ ते रात्री १२ दरम्यान अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा अपवाद वगळता, सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी असणार आहे. या वाहनांना केवळ रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेतच प्रवेश मिळणार आहे. इस्टर्न फ्रीवेवरदेखील बससेवा वगळता अवजड वाहनांना दिवसरात्र बंदी असणार आहे. खासगी प्रवासी बसगाड्यांना शहरात परवानगी असेल, मात्र दक्षिण मुंबईत प्रवेशबंदी असणार आहे. अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. सर्वसामान्यांचा प्रवास सुकर व्हावा, म्हणून हे नियम लागू केल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
----
पार्किंग नियमही कडक
अवजड वाहनांना पार्किंगसाठी राखीव जागेवरच उभी करता येईल. सार्वजनिक रस्त्यांवर पार्किंग करण्यास मनाई असेल. पाणी भरण्याच्या ठिकाणी केवळ दोनच टँकर थांबतील.
----
ट्रान्सपोर्ट संघटनांचा विरोध
अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीमुळे दक्षिण मुंबईतील कामकाजावर परिणाम होईल. केवळ अत्यावश्यक वाहनांनाच परवानगी दिल्यास भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो. ट्रक हे फिरण्यासाठी नसून गरजेच्या कामासाठीच रस्त्यावर असतात, अशा शब्दात ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष बाल मलकित सिंग यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: शिर्डीच्या प्राईम भूखंडावर घाईघाईने गव्हाची कापणी! कॅप्टन खरातच्या अफाट संपत्तीचे धक्कादायक रहस्य उघड... कुठे किती संपत्ती?

Nashik Temple Theft : देवही सुरक्षित नाहीत! सातपूरमधील ३ मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा चोरटा गजाआड

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT