मुंबई

निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला आभासी अटक

CD

निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला आभासी अटक
दया नायक यांचे नाव वापरून १.२७ कोटी उकळले; सायबर पोलिसांकडून एकास अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला आभासी अटकेत ठेवून सव्वा कोटींचा गंडा घालणाऱ्या सायबर भामट्यांच्या टोळीतील एका व्यक्तीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रवीण जगताप, असे या आरोपीचे नाव असून, त्याने स्वतःचे खाते फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी भामट्यांना देऊ केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार वृद्धास चकमकफेम अधिकारी, निवृत्त सहाय्यक आयुक्त दया नायक यांच्या नावे धमकावण्यात आले होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पश्चिम उपनगरात राहणाऱ्या वृद्धास बंगळूर शहरातील अशोक नगर पोलिस ठाण्यातील अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीने संपर्क साधला. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग, दिल्ली पोलिसांच्या मदतीने सुरू असून, त्यात आपले नाव पुढे आले आहे. साधारण ७५ लाख रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार आपल्या खात्यांवरून झाल्याचे पुरावे आहेत. त्याआधारे आपल्याला अटक केली जाईल, असे सांगत वृद्धाला घाबरून सोडण्यात आले.
पुढे आणखी दहशत निर्माण करण्यासाठी दया नायक असल्याचे भासवून अन्य एका व्यक्तीने वृद्धाशी संपर्क साधला. व्हिडिओ कॉलवर वृद्धाचा आरोपी असा उल्लेख असलेला प्रथम खबरी अहवाल अर्थात एफआयआर आणि अटक वॉरंट दाखवण्यात आले.
दुसरीकडे न्यायालयाचे आदेश असले तरी आपल्या वयाचा मान राखत लगेच अटक करणार नाही, अशी सहानुभूतीही त्यांना दाखवण्यात आली. अटक न करता आधी आम्ही आपली बँक खाती, गुंतवणुकीबाबत तांत्रिकरीत्या तपास करू. त्यात तथ्य आढळल्यास अटक करू, असे सांगत या वृद्धाला तपासाच्या निमित्ताने सुमारे १.२७ कोटी रुपये विविध बँक खात्यांवर जमा करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर भामट्यांनी वृद्धासोबतचा संपर्क तोडला.
फसवणुकीची जाणीव होताच वृद्धाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. सायबर पोलिसांनी (पश्चिम विभाग) फसवणुकीची रक्कम वळवण्यात आलेल्या बँक खात्यांच्या तपशिलांआधारे तपास केला. त्यात एक खाते आरोपी जगताप याचे होते, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT