मुंबई

महापालिका रुग्णालयांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर भर

CD

महापालिका रुग्णालयांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर भर
कांदिवली रुग्णालयातील प्रकल्पाचे नूतनीकरण; महापालिकेकडून निविदा जाहीर
मुंबई, ता. ३ : महापालिकेच्या कांदिवली पश्चिमेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका सामान्य रुग्णालयात सांडपाणी व्यवस्थापनासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे.
रुग्णालयातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा दर्जा सुधारण्यासाठी पालिकेने ई-निविदा जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प यशस्वी झाल्यास मुंबईतील पालिकेच्या इतर सर्व मोठ्या रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारचे प्रकल्प राबवण्याचा पालिकेचा मानस आहे.

​रुग्णालयातून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणारे सांडपाणी थेट जलस्रोतात न सोडता, त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाने प्रक्रिया केली जाणार आहे. यामध्ये सांडपाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आणि त्याचे शुद्धीकरण करणे या कामांचा समावेश आहे. त्‍यामुळे पर्यावरणाची हानी टळणार असून, पाण्याचा पुनर्वापर करणेही शक्य होणार आहे.
या ​प्रकल्पामुळे पर्यावरण रक्षण होणार असून, दूषित पाणी थेट निसर्गात सोडल्यामुळे होणारे प्रदूषण थांबेल, सांडपाण्यातील घातक घटकांचा नायनाट झाल्यामुळे रुग्णालयाच्या परिसरातील आरोग्य सुरक्षित राहील. प्रक्रिया केलेले पाणी बागकाम किंवा इतर स्वच्छतेच्या कामांसाठी वापरता येईल, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होईल. तसेच हा प्रकल्प एक ‘मॉडेल’ म्हणून पाहिला जात आहे. येथील यशामुळे इतर रुग्णालयांसाठी एक नवी दिशा मिळेल.
​मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान असते. कांदिवली येथील हा प्रयोग जर यशस्वी ठरला, तर महापालिका आपल्या केईएम, सायन, नायर आणि इतर उपनगरीय आणि मुख्य रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. त्‍यामुळे पालिकेची रुग्णालये अधिक ‘इको-फ्रेंडली’ होण्यास मदत होईल. त्‍यासाठी महापालिकेने ​निविदा प्रक्रिया सुरू केली असून, अर्ज मागवले आहेत.

प्रकल्पाचे मुख्य फायदे
​१. पर्यावरण रक्षण : दूषित पाणी थेट निसर्गात सोडल्यामुळे होणारे प्रदूषण थांबेल.
२. आरोग्य सुरक्षा : सांडपाण्यातील घातक घटकांचा नायनाट झाल्यामुळे रुग्णालयाच्या परिसरातील आरोग्य सुरक्षित राहील.
३. पाण्याची बचत : प्रक्रिया केलेले पाणी बागकाम किंवा इतर स्वच्छतेच्या कामांसाठी वापरता येईल, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होईल.
४. पथदर्शी प्रकल्प : हा प्रकल्प एक ‘मॉडेल’ म्हणून पाहिला जात आहे. याच्या यशामुळे इतर रुग्णालयांसाठी एक नवी दिशा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT