मुंबई

ऐतिहासिक वास्तू शहराच्या इतिहासाचा अविभाज्य भाग

CD

ऐतिहासिक वास्तू शहराच्या इतिहासाचा अविभाज्य भाग
वाडिया क्लॉक टॉवरच्या उद्‍घाटनावेळी बोमन इराणी यांचे मत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईतील ऐतिहासिक वास्तू शहराची ओळख असून, त्या इतिहासाचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग असल्याचे मत रुस्तमजी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बोमन रुस्तम इराणी यांनी व्यक्त केले. फोर्ट येथील ऐतिहासिक वाडिया क्लॉक टॉवरचे उद्‍घाटन इराणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या ऐतिहासिक क्लॉक टॉवरचे उद्‍घाटन पारशी परंपरेनुसार दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आले.  या वेळी पारशी समाजासह अन्य मान्यवरही उपस्थित होते. मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे किंवा वास्तू आपल्याला नेहमीच भावतात. या वास्तू शहराच्या इतिहासाचे, कथांचे जतन करतात. वाडिया क्लॉक टॉवर ही निव्वळ एक वास्तू नसून मुंबईच्या जीवनाचा जिवंत भाग आहे. त्यामुळेच या ऐतिहासिक वास्तूला समाजात असलेले सन्मानाचे स्थान पुन्हा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच वाडिया यांच्या सन्मानार्थ उभारलेल्या या स्मारकाचे नूतनीकरण करणे हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण असल्याचेही इराणी यांनी सांगितले.
या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा जीवन मिळाले आहे. तसेच  येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी सांस्कृतिक समृद्धी अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केल्याचे काळा घोडा असोसिएशनच्या अध्यक्ष बिंद्रा मिलर यांनी सांगितले. हा प्रकल्प वारसा संवर्धनाचे उत्तम उदाहरण आहे. संरचनेचे मजबूतीकरण करून ऐतिहासिक घड्याळाच्या  यंत्रणेसह  मूळ  संरचना  पुनर्जीवित केल्यामुळे  हा  टॉवर  मुंबईच्या  स्थापत्य  इतिहासाचा  साक्षीदार  म्हणून  दिमाखात  उभा  राहील, असा विश्वास वास्तुविशारद विकास बिलादरी यांनी व्यक्त केला.
बोमनजी होर्मुसजी वाडिया हे पारशी समुदायातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. १८२६ ते १८५१ इतका प्रदीर्घ काळ पारशी पंचायतीचे ते विश्वस्त होते. त्याचप्रमाणे १८३४ पासून सलग ११ वर्षे ‘जस्टिस ऑफ पीस’ म्हणूनही कार्यरत होते. त्यांची शहराच्या कार्याप्रति कृतज्ञता म्हणून ३ जुलै १८६२मध्ये त्यांच्या निधनानंतर बरोबर १० वर्षांनी म्हणजे १८७२ साली त्यांच्या स्मरणार्थ क्लॉक टॉवरसह सहा पाणपोया उभारण्यात आल्या. टॉवरची स्थापत्य शैली प्राचीन पर्शियन असून, २५०० वर्षांपूर्वीच्या क्युनेइफॉर्म लिपीमधील अक्षरे तिन्ही बाजूंना कोरली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT