सीईटीच्या प्रवेश
नोंदणीस मुदतवाढ
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.एड. (जनरल व स्पेशल), बी.एड. (ईएलईसीटी), मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) आणि मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीला २४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
एमपीएड व एमएड या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणीसाठी १० फेब्रुवारीपर्यंत, तर बी.एड. (जनरल व स्पेशल), बी.एड. (ईएलईसीटी) या अभ्यासक्रमासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत हाेती. आतापर्यंत एमपीएडसाठी १,९९४ व एमएडसाठी २,७५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमपीएडची प्रवेश परीक्षा २४ मार्चला होणार आहे, तर याची फिल्ड परीक्षा २५ मार्च २०२६ला होणार आहे. एमएडची प्रवेश परीक्षा २५ मार्च २०२६ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.