मुंबई

मुंबईतील पुनर्विकासाला ‘डिजिटल’ गती

CD

मुंबईतील पुनर्विकासाला ‘डिजिटल’ गती

एआय, जीआयएसआधारित पालिकेचे पोर्टल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना वेग देण्यासाठी आणि ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरासाठी मुंबई रिडेव्हलपमेंट फॅसिलिटेशन पोर्टल (एमआरएफपी) हा एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या हायटेक पोर्टलसाठी पालिकेच्या विकास नियोजन (डीपी) विभागातर्फे अनुभवी आयटी कंपन्यांकडून ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत पुनर्विकासासाठी सिंगल विंडो सिस्टीम आणण्यात येणार आहे.

​हे पोर्टल कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग (एमएल) आणि भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असेल. याचे मुख्य उद्दिष्ट पुनर्विकासाच्या कामांसाठी ‘सिंगल विंडो’ सुविधा उपलब्ध करून देणे आहे.

​पुनर्विकासाशी संबंधित सर्व प्रक्रिया एकाच छताखाली येणार असून, निर्णय प्रक्रियेसाठी प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. प्रकल्पांचे भौगोलिक मॅपिंग आणि डॅशबोर्डद्वारे रिअलटाइम मॉनिटरिंग शक्य होणार आहे. पालिकेच्या आणि सरकारच्या इतर विद्यमान यंत्रणांशी हे पोर्टल थेट जोडले जाईल.

पोर्टलच्या माध्यमातून कामात पारदर्शकता येणार असून, माहितीची सुरक्षितता राखण्यासाठी केंद्र सरकारच्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याचे पालन केले जाणार आहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीनेही हे पोर्टल अत्यंत मजबूत असेल, अशी माहिती पालिकेच्या मुख्य अभियंत्यांनी (विकास नियोजन) दिली आहे.

​इच्छुक कंपन्यांना पालिकेच्या अधिकृत ई-प्रोक्युरमेंट पोर्टलवरून सविस्तर कागदपत्रे डाऊनलोड करता येतील. या तंत्रज्ञानामुळे मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्या आणि बिल्डर्सना पुनर्विकासाच्या प्रस्तावांसाठी लागणारा वेळ कमी होऊन प्रक्रियेत मोठी सुलभता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
.........
महापालिकेची ई-निविदा
या प्रकल्पाचे डिझाइन, विकास, अंमलबजावणी आणि देखभाल करण्यासाठी पालिकेने अनुभवी कंपन्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. १६ डिसेंबरपासून निविदा दस्तऐवज उपलब्ध करण्यात आली आहेत. ऑनलाइन अर्ज १७ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारण्यात आले आहेत. तांत्रिक निविदा उघडण्याची तारीख १८ जानेवारी होती; मात्र काही तांत्रिक करणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. या आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT