मुंबई

दुर्मिळ मोहरा, नाण्यांची तस्करी

CD

दुर्मिळ मोहरा, नाण्यांची तस्करी

कुशाण, मुघल, ब्रिटिश राजवटीशी संबंधित; लंडनहून आलेल्या प्रवाशाला अटक

मुंबई, ता. १२ ः ब्रिटिश आणि त्याआधीच्या राजवटीतील दुर्मिळ सोने-चांदीच्या मोहरा, नाण्यांची तस्करी करणाऱ्या व्यक्तीस सीमा शुल्क विभागाने मंगळवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. सीमा शुल्क विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती लंडनहून व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईत उतरला. कस्टम विभागाने या व्यक्तीची झाडाझडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे सोने-चांदीची तीन दुर्मिळ (अँटीक) मोहरा आढळल्या. या माेहरांचे वजन कमी असले तरी त्या तिसऱ्या आणि अठराव्या शतकातील असल्याने अत्यंत दुर्मिळ आहेत. त्यामुळेच त्याची काळ्या बाजारातील किंमत कोट्यवधींच्या घरात असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून या व्यक्तीने ही नाणी लंडन किंवा अन्य देशातील संग्रहालयातून चोरली की चोरीची नाणी विकत घेऊन भारतात आणली, याबाबत तपास सुरू असल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

सीमा शुल्क विभागाने जप्त केलेल्या नाणी, मोहरांमध्ये अठराव्या शतकात (१७८८) ब्रिटिशांच्या अधिपत्याखील बंगाल प्रांतातील मुर्शिदाबाद टांकसाळीत शाह आलम (द्वितीय) यांच्या नावे तयार केलेली सोन्याची मोहर (१२.३७ ग्रॅम), प्राचीन कुशाण साम्राज्यातील पहिल्या ते तिसऱ्या शतकात तयार करण्यात आलेला आठ ग्रॅम वजनाचा सोन्याचा दिनार आणि मुघल काळातील चांदीचे चलनी नाणे समाविष्ट आहे. चांदीच्या नाण्यावर एका बाजूला जहांगीर तर दुसऱ्या बाजूला कर्क राशी चिन्ह छापण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT