मध्य रेल्वेची प्रवासी संख्या १,३७३ दशलक्ष पार
जानेवारीत मुंबई उपनगरीय मार्गावर १२७ दशलक्ष प्रवासी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वर्षात एकूण १,३७३ दशलक्षांहून अधिक प्रवाशांनी मध्य रेल्वेने प्रवास केला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ १.८६ टक्के असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर तसेच इतर गाड्यांमधून मिळून १७१.४६ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला. मागील वर्षी ही संख्या १६०.४१ दशलक्ष होती. यावरून लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेतून १४६.२९ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला. त्यापैकी १२९.०८ दशलक्ष प्रवासी उपनगरीय लोकलने, तर १७.२० दशलक्ष प्रवासी मेल-एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास केला.
मुंबई उपनगरीय मार्गावर आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १,२०१.९३ दशलक्ष प्रवाशांची नोंद झाली. मागील वर्षी ही संख्या १,१८७.९२ दशलक्ष होती. जानेवारी २०२६ मध्येच १२७ दशलक्षांहून अधिक प्रवाशांनी लोकलने प्रवास केला. हार्बर मार्गावर सुरू केलेल्या वातानुकूलित लोकल सेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या १६ दिवसांत सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा वापर केला.
.....
नवीन स्थानके
मध्य रेल्वे दररोज सुमारे १,८२० उपनगरीय फेऱ्या चालवते. त्यात ९४ वातानुकूलित लोकल सेवांचा समावेश आहे. नेरूळ/बेलापूर- उरण मार्गावर वाढीव सेवा, तसेच तरघर आणि गव्हाण ही नवीन स्थानके सुरू झाल्याने प्रवाशांची संख्या वाढल्याचे रेल्वेने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.