मुंबई

विवाहबंधनात अडकताच नवरदेवाच्या हाती बेड्या

CD

विवाहबंधनात अडकताच
नवरदेवाच्या हाती बेड्या
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा
मुंबई, ता. १९ ः विवाहबंधनात अडकल्यानंतर पुढल्याच क्षणी नवरदेवाच्या हाती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. टिळकनगर पोलिस ठाण्यात नुकताच हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे परिसरातीलच तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबीयांना याबाबत कल्पना नसल्याने तरुणीच्या पालकांनी तिच्यासाठी नात्यातीलच स्थळ पाहिले होते. ती प्रौढ होताच साखरपुडा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. याबाबत समजताच या प्रेमीयुगुलाने पळून जात कौटुंबिक न्यायालयात कायदेशीररीत्या लग्न केले. प्रक्रियेनुसार लग्नानंतर पालकांना कळवणे क्रमप्राप्त असल्याने नवदाम्पत्य टिळकनगर पोलिस ठाण्यात पोहोचले.
पोलिसांनी दोघांच्याही पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. दोघेही कायदेशीर पती-पत्नी झालेत. आता पालकांनी विरोध करू नये, ही समज पोलिस पालकांना देणार होते; मात्र तरुणीच्या पालकांनी समोर ठेवलेला मुलीचा जन्मदाखला आणि शैक्षणिक कागदपत्रे पाहून पोलिसही अवाक् झाले. तरुणी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी नवरदेवाकडे मोर्चा वळवला. त्याने प्रेयसीचे बोगस आधार कार्ड तयार करून ती प्रौढ असल्याबाबत कौटुंबिक न्यायालयाला भासवल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी नवरदेवावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT