टाटा पंच ईव्ही ९.६९ लाखांपासून
मुंबई, ता. २० : टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलने आपली नवी वेगळ्या स्वरूपातील इलेक्ट्रिक मोटार ‘पंच’ बाजारात आणली असून, ती ९.६९ लाख रुपयांपासून मिळेल. कंपनीतर्फे आज या गाडीचे अनावरण येथे पत्रकारांसमोर करण्यात आले.
३० आणि ४० केडब्ल्यू बॅटरी असलेल्या या गाडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या किमती १२ लाख ५९ हजार रुपयांपर्यंत आहेत. गाडीचे बुकिंग आजपासूनच खुले झाले आहे. हिल रोड असिस्टंट, आरामदायी आसन व्यवस्था, अन्य सुरक्षा साधने व इतर अत्याधुनिक व्यवस्थादेखील या गाडीत आहे. ही गाडी एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यावर २५५ किलोमीटर अंतर जाऊ शकते. २६ मिनिटांतच या गाडीची बॅटरी ८० टक्के चार्ज होईल. गाडी १३५ किलोमीटर जाईल एवढे चार्जिंग फक्त पंधरा मिनिटांत होईल. बॅटरीची आयुष्यभरासाठी (अमर्यादित किलोमीटर धावली तरीही) वॉरंटी आहे. ही गाडी १०० किलोमीटरपर्यंतचा वेग फक्त नऊ सेकंदात घेऊ शकते. देशभरात टाटाचे सार्वजनिक पाच हजार चार्जर आहेत, तर कॉमन चार्जिंग व्यवस्था देण्यासाठी अनेक सोसायट्यांनाही त्यांनी विनंती केली आहे. नवी दिल्ली एनसीआर परिसरात मोबाईल टेंपो चार्जर व्यवस्थाही आम्ही आणली आहे, असे टाटाच्या आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.