मुंबई

संशोधनाधारित उपचार, मानकीकरणाला प्राधान्य ! युनानी राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञाकडून दिशा ठरली

CD

संशोधनाधारित उपचार, मानकीकरणाला प्राधान्य
युनानी राष्ट्रीय परिषद; आधुनिक वैद्यक प्रणालीशी सुसंगत करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : देशातील युनानी वैद्यकशास्त्र अधिक वैज्ञानिक, परिणामाधारित आणि आधुनिक वैद्यक प्रणालीशी सुसंगत करण्याची स्पष्ट दिशा मुंबईत आयोजित राष्ट्रीय युनानी परिषदेच्या माध्यमातून ठरवण्यात आली आहे. युनानी प्रॅक्टिसमधील नवोपक्रम आणि पुरावे या विषयावर झालेल्या या परिषदेत संशोधन, मानकीकरण, क्लिनिकल डेटा संकलन आणि उद्योग ़ शासन सहकार्य यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या पुढाकाराने आयोजित परिषदेत युनानी उपचारपद्धतीसाठी पुराव्यावर आधारित प्रोटोकॉल तयार करणे, क्लिनिकल ट्रायल्स वाढवणे आणि राष्ट्रीय पातळीवर मानके निश्चित करणे यावर एकमत झाले. यामुळे युनानी उपचारांची विश्वासार्हता आणि स्वीकारार्हता वाढेल, असा सूर तज्ज्ञांनी व्यक्त केला.

सरकार कटिबद्ध
परिषदेत उपस्थित आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, युनानी वैद्यकशास्त्र हे भारताच्या पारंपरिक ज्ञानसंपदेचा महत्त्वाचा भाग असून, त्याला आधुनिक वैज्ञानिक चौकटीत अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. वाढत्या जीवनशैलीजन्य व दीर्घकालीन आजारांवर युनानी उपचार प्रभावी ठरू शकतात, यासाठी संशोधनाला चालना दिली जाईल.

सामंजस्य करार
या परिषदेत आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन आणि हमदर्द लॅबरोटरीज यांच्यात सामंजस्य कराराअंतर्गत संयुक्त संशोधन, नव्या औषधांचा विकास आणि मानकीकरणासाठी एकत्रित काम केले जाणार आहे. तसेच तज्ज्ञांच्या मते, विकसित भारत २०४७ या दृष्टीकोनानुसार युनानी वैद्यकशास्त्राला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही परिषद निर्णायक ठरणार आहे. यामुळे युनानी उपचार पद्धतीला केवळ परंपरेपुरते मर्यादित न ठेवता, वैज्ञानिक आधारावर मजबूत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

परिषदेत ठरलेले प्रमुख मुद्दे :
*युनानी उपचारांसाठी राष्ट्रीय स्तरावरील मानके विकसित करणे
*मोठ्या प्रमाणावर क्लिनिकल ट्रायल्स आणि परिणामाधारित अभ्यास
*पारंपरिक ज्ञानाचे डिजिटल दस्तऐवजीकरण आणि डेटाबेस निर्मिती
*उद्योग-शासन-संशोधन संस्था यांच्यात भागीदारी वाढवणे
*युनानी शिक्षण आणि प्रॅक्टिसमध्ये नवोपक्रमांना प्रोत्साहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT