मुंबई

क्लॉटिंग फॅक्टरच्या तुटवड्याने हिमोफेलिया रुग्ण अडचणीत

CD

हिमोफिलिया रुग्ण अडचणीत
क्लॉटिंग फॅक्टरचा तुटवडा; पाच हजार ५०० रुग्णांवर उपचारांचे संकट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : राज्यात हिमोफिलिया रुग्णांना जीवनरक्षक क्लॉटिंग फॅक्टरची अनियमित उपलब्धता, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि विलंबित खरेदी प्रक्रियेचा फटका बसत आहे. सुमारे पाच हजार ५०० रुग्णांच्या उपचारांवर याचा परिणाम होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्यातील हिमोफिलिया रुग्णांना सध्या उपचारांच्या उपलब्धतेसंदर्भात गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिमोफिलिया फेडरेशन (इंडिया)शी संलग्न असलेल्या हिमोफिलिया सोसायटीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. संस्थेचे मानद सचिव जिगर कोटेचा यांनी सांगितले की, जीवनरक्षक क्लॉटिंग फॅक्टर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने आणि अनेक रुग्णालयांमध्ये हेमेटोलॉजिस्ट नसल्याने सक्रिय रक्तस्रावाच्या वेळी रुग्णांना त्वरित उपचार मिळत नाहीत. त्यामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आणि जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. हिमोफिलिया हा आनुवंशिक रक्तस्राव विकार असून, यात रक्त योग्य प्रकारे गोठत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. परिणामी रुग्णांना सांधे, स्नायू, पोट किंवा मेंदूत आंतररक्तस्राव होण्याचा धोका असतो. उपचारात थोडाही विलंब झाला, तर गंभीर परिणाम होऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले.

अर्थसंकल्पीय तरतूद नाही
संस्थेच्या म्हणण्यानुसार, राज्यात हिमोफिलिया उपचारांसाठी स्वतंत्र आणि समर्पित राज्यस्तरीय अर्थसंकल्पीय तरतूद नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मिळणारा निधी प्रत्यक्ष गरजांच्या तुलनेत अपुरा असल्याचेही सांगण्यात आले. काही महापालिका रुग्णालयांमध्ये क्लॉटिंग फॅक्टर खरेदीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध नसल्याची माहिती संस्थेने दिली आहे.

ठोस निर्णयाची मागणी
तातडीने समर्पित अर्थसंकल्पीय तरतूद करणे, क्लॉटिंग फॅक्टरची नियमित उपलब्धता सुनिश्चित करणे, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे आणि खरेदी प्रक्रिया गतिमान करणे याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी संस्थेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोणत्याही रुग्णाचा जीव उपचारातील विलंबामुळे धोक्यात येऊ नये, यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT