मुंबई

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

CD

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. २२) रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड ते ठाणे अप व डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई ते विरार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
.......
मध्य रेल्वे -
कुठे- मुलुंड ते ठाणे अप व डाऊन धीम्या मार्गावर
कधी- सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत

परिणाम-
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल गाड्या मुलुंड ते ठाणेदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथे त्या पुन्हा धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या ठाणे ते मुलुंडदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड येथे त्या पुन्हा धीम्या मार्गावर येतील. या दोन्ही दिशेच्या लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावतील.

.....
हार्बर मार्ग
कुठे- पनवेल ते वाशी (पोर्टलाइन वगळून) अप व डाऊन मार्गावर
वेळ- सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम -
ब्लॉक कालावधीत पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप गाड्या तसेच सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन गाड्या रद्द राहतील. ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या अप सेवा आणि ठाणेहून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येतील. ठाणे-वाशी/ नेरूळदरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा उपलब्ध राहतील. पोर्टलाइनवरील सेवा नियमित सुरू राहतील.
.....

पश्चिम रेल्वे
कुठे- वसई रोड ते विरार अप-डाऊन धीम्या मार्गावर
वेळ - शनिवार-रविवार रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत
परिणाम -
या कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व उपनगरीय गाड्या वसई रोड- विरारदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील.
.......

गर्डर टाकण्यासाठी प्रमुख ब्लॉक
बोरिवली- दहिसरदरम्यान सर्व अप व डाऊन मार्गांवर रात्री २.१० ते पहाटे ४.१० या वेळेत प्रमुख ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत नव्या फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)च्या गर्डर लॉन्चिंगचे काम केले जाणार आहे. त्यामुळे काही उपनगरीय तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT