कुलाब्यात तरुणावर प्राणघातक हल्ला
मुंबई, ता. २० ः पूर्ववैमनस्यातून जाफर खानवर (वय २४) बुधवारी कुलाब्यातील सुविधा आर्मी गेटसमोर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर कफ परेड पोलिसांनी गुन्हा नोंदवला. कैलास गोरेगावकर, दीपाली सदाफुले अशी आरोपींची नावे असल्याचे कफ परेड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.
गायकवाड यांच्या माहितीनुसार, जखमी जाफर आणि कैलास यांच्यात जुना वाद होता. त्या वादातून बुधवारी (ता. १८) सकाळी सुविधा आर्मी गेटजवळ कैलासने जाफरवर हल्ला केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.