मुंबई

कामाठीपुरा पुनर्विकासाचं घोडं सरकार दरबारी अडलं!

CD

कामाठीपुरा पुनर्विकासाचे घोडे सरकार दरबारी अडले!
विकसकाच्या निविदेला अंतिम मंजुरी मिळेना; रहिवाशांकडून नाराजी
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : वर्षानुवर्षे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेले कामाठीपुराच्या पुनर्विकासाचे घोडे सरकार दरबारी अडले असल्याचे समोर आले आहे. कामाठीपुराच्या पुनर्विकासाकरिता म्हाडाने मागवलेल्या तांत्रिक आणि आर्थिक निविदेत एएटीके कन्स्ट्रक्शन कंपनी पात्र ठरली असून, त्याला राज्य सरकारच्या उच्चाधिकारी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव नोव्हेंबरमध्ये अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. दरम्यान, गेल्या साडेतीन महिन्यांत त्यावर सरकारने कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी असून, सरकारने उशिरा का होईना पण मजुरी देऊन पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
कामाठीपुरा हा सुमारे ३४ एकर जागेवर वसला असून, तेथे ९४३ जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने या इमारतींचा विकास खासगी विकसकाच्या माध्यमातून करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार म्हाडाने प्रसिद्ध केलेल्या निविदेनुसार जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर आणि एएटीके कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी जे. कुमार ही कंपनी तांत्रिक छाननीत बाद ठरल्याने म्हाडाने एएटीके कन्स्ट्रक्शनने भरलेल्या आर्थिक निविदा उघडू त्याचा प्रस्ताव राज्य सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीकडे पाठवला होता. राज्याचे गृहनिर्माण सचिव, म्हाडाचे उपाध्यक्ष, म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अशा अधिकाऱ्यांची उच्चाधिकार समिती असून, त्यांनी संबंधित विकसक कंपनीला मंजुरी देत त्याबाबतचा प्रस्ताव अंतिम मजुरीकरिता गृहनिर्माण विभागाकडे पाठवला आहे. मात्र गेल्या साडेतीन महिन्यांत त्यावर कोणताच निर्णय झाला नसून, हा प्रस्ताव धूळखात पडून आहे. त्यामुळे रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, निवडणुका आल्यानंतरच आमच्या पुनर्विकासाबाबत चर्चा होत असल्याची त्यांची भावना झाली आहे.

रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर, म्हाडाला १,००० घरे
या पुनर्विकासाच्या माध्यमातून रहिवासी-भाडेकरूंना ५०० चौरस फुटांची सदनिका दिली जाणार असून, ८०० जागामालकांना प्रति ५० चौरस मीटर जागेकरिता ५०० चौरस फुटाची एक सदनिका मिळणार आहे. तर म्हाडाला सुमारे ९००-१,००० सदनिका उपलब्ध होणार असून, त्याची लॉटरीच्या माध्यमातून मुंबईकरांना विक्री होऊ शकणार आहे.

निवडणुका आल्या की आमच्या पुनर्विकासाची चर्चा होते, मात्र त्यानंतर काहीच होत नाही. विकासक नियुक्तीला सरकारने मंजुरी न दिल्याने पुढील प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे सरकारने उशिरा का होईना पण मंजुरी देऊन पुनर्विकास मार्गी लावावा. पुढील निवडणुकीची वाट पाहायला लावू नये.
- कृष्णा कांबळे, रहिवासी

कामाठीपुराच्या पुनर्विकासासाठी निविदेच्या माध्यमातून विकासक नेमला आहे. त्याला उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सरकारने आता आणखी वेळ न घेता मंजुरी देत प्रत्यक्ष कामाला कशी सुरुवात होईल ते पाहावे.
- सचिन कर्पे, अध्यक्ष, कामाठीपुरा गणेशोत्सव मंडळ

- एकूण जागा - ३४ एकर
- इमारती - ९४३
- भाडेकरू - ८,०००
- तयार होणारे विक्रीयोग्य क्षेत्रफळ - ५ लाख चौ. मीटर
- म्हाडाला मिळणारे क्षेत्रफळ - ४५-५० हजार चौ. मीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget Session: अधिवेशन सुरू होण्याआधीच रणसंग्राम! बहिष्कार, सरकारला 6 गंभीर मुद्द्यांवर घेरण्याची तयारी, काय आहे विरोधकांचा प्लॅन?

Ozar Bus Stand : ओझर बसस्थानकात अखेर पाच वर्षांनंतर लालपरीची ‘घरवापसी’! आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन झुकले

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

SCROLL FOR NEXT