मुंबई

बांगलादेशी घुसखोरांना कागदपत्रे पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

CD

बांगलादेशी घुसखोरांना कागदपत्रे पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
मुख्य आरोपीसह महानगर प्रदेशातील सहा एजंटांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः बांगलादेशी घुसखोरांना बनावट शिधापत्रिका व अन्य कागदपत्रे तयार करून देत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या टोळीला दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटक आरोपींमध्ये बनावट कागदपत्रे तयार करण्यापासून महानगर प्रदेशातील एजंटांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशी घुसखोरांना भारतीय विशेषतः मुंबई किंवा आसपासच्या उपनगरातील अधिवास स्पष्ट करण्यासाठी शिधापत्रिका, आधार कार्डची निकड भासते. त्यासोबत आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत सेवा देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि अन्य शासकीय योजनांचा लाभ लागण्यासाठी किंवा तो लाभ मिळवून देण्यासाठी बनावट शिधापत्रिकांची आवश्यकता भासते.
ही बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या सुजल दयाळ या आरोपीस गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा त्याच्या ताब्यातून बनावट झोपडपट्टी फोटो पास पावती, तीन एमएमआरडीएची ताबापत्रे आणि तीन कोऱ्या शिधापत्रिका जप्त करण्यात आल्या. पथकाने विरार येथील सुजलच्या निवासस्थानी छापा घातला असता तेथून ३४३ बनावट शिधापत्रिका, लॅपटॉप, प्रिंटर, कागद आदी सामग्री सापडली.
चौकशीदरम्यान शासकीय योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांकडून या बनावट दस्त, कागदपत्रांची बरीच मागणी असते. मागणीनुसार ती कागदपत्रे तयार करून देतो, असे सुजलने सांगितले. त्याच्याकडून बनावट कागदपत्रे विकत घेणाऱ्या मुंबईसह महानगर प्रदेशातील एजंटांची माहिती मिळवून पोलिस पथकाने सहा जणांना अटक केली.
राकेश सिंग (४३), दिनेशकुमार केसरवाणी (४०), एडवर्ड ऊर्फ सोनू सेबेस्टीन डिसोजा (४६), मणिशंकर शर्मा (३१), विपीन पांडे (४२) आणि वीरू गुप्ता (३१) अशी त्यांची नावे आहेत.
ही कारवाई परिमंडळ १२चे पोलिस उपायुक्त महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाल दिंडोशी पोलिस ठाण्याचे एटीसी अधिकारी सहाय्यक निरीक्षक शिवशंकर भोसले, उपनिरीक्षक नितीन सवणे, मुलाणी, अंमलदार कांबळे, मोरे, शिंदे, काळे, कोळी, भंडारे, सावर्डे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT