मुंबई

​५१ लाख विद्यार्थ्यांचे सुरावटीतून विश्वविक्रमाला गवसणी; श्री गुरु तेग बहादुरजींना अनोखी मानवंदना :

CD

​५१ लाख विद्यार्थ्यांच्या सुरावटीतून विश्वविक्रमाला गवसणी
श्री गुरू तेग बहादूरजींना अनोखी मानवंदना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५०व्या शहिदी समागमनिमित्त उद्या, सोमवारी (ता. २३) महाराष्ट्र एक ऐतिहासिक सुवर्णक्षण अनुभवणार आहे. राज्यभरातील ५१ लाख विद्यार्थी एकाच वेळी समूह गीतगायन करून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. या महाकाय उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’कडून घेण्यात येत असून, या विक्रमी कामगिरीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक विकास विभाग तसेच राज्यस्तरीय समागम समितीद्वारा ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजी ३५०वा शहिदी समागमचे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनप्रवासावर आधारित गीताचे मुंबईतील सात लाख १४ हजार ६२६ विद्यार्थी सोमवारी (ता. २३) समूह गायन करणार आहेत. यापैकी सकाळच्या सत्रातील विद्यार्थी सकाळी ९ वाजता तर दुपारच्या सत्रातील विद्यार्थी दुपारी १ वाजता शाळेच्या परिपाठावेळी गायन करतील.
......

Maharashtra Budget 2026: अजित पवारांनी अर्थसंकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, पण दुर्दैवाने ही जबाबदारी माझ्यावर आली - देवेंद्र फडणवीस

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीप ऑन फायर! पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला दिले ३ धक्के; पाहा Video

Shegaon Temple: राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शेगावातील श्रींचे मंदिर भक्तांसाठी राहणार बंद; सुरक्षेच्या दृष्टीकोणातून खबरदारी!

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

SCROLL FOR NEXT