अधिवेशनात पे अँड पार्क सुविधा रद्द
मान्यवरांची वाहने वगळता इतरांना पार्किंग प्रतिबंध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. अधिवेशन सोमवार (ता. २३)पासून सुरू होत आहे. ते संपेपर्यंत विधान भवन परिसरात अडथळे, वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेसाठी विशेष निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी पे अँड पार्क सुविधा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून, मान्यवरांच्या वाहनांवरील पार्किंग वगळता इतर सर्व वाहनांना प्रतिबंध आहे.
अधिवेशनासाठी विधान भवनात मान्यवरांच्या वाहनांसाठी जागा अपुरी पडत असल्याने खालील पे अँड पार्क सुविधा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. यामध्ये जमनालाल बजाज मार्ग (उषा मेहता चौक ते जमनालाल बजाज मार्ग डेड एंड) विनय के शहा मार्ग (जमनालाल बजाज मार्ग जंक्शन ते मुरली देवरा चौक) दोराबजी टाटा रोड (मुरली देवरा चौक ते गेंडा पॉइंट) रामनाथ गोएंका मार्ग (साखर भवन जंक्शन ते विधान भवन मार्ग) विधान भवन मार्ग (युनियन बँक बिल्डिंग ते मादाम कामा रोड) याशिवाय, मान्यवरांच्या वाहनांसाठी खालील ठिकाणी पार्किंग उपलब्ध असले तरी इतर वाहनांना मनाई आहे.
व्हि. व्हि. राव मार्ग फ्री प्रेस जनरल मार्ग तसेच, गरज भासल्यास रामनाथ गोएंका मार्गावर साखर भवन जंक्शन ते विधान भवन मार्गापर्यंत रस्ता पूर्णपणे बंद राहील. हे निर्बंध पोलिस, फायर ब्रिगेड आणि ॲम्बुलन्स वाहनांना लागू होणार नाहीत. सदर आदेश २३ फेब्रुवारीपासून अधिवेशन संपेपर्यंत अमलात राहतील. या बदलांमुळे विधान भवन परिसरातील वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागेल. नागरिकांनी वाहतूक विभागाच्या सूचना पाळून गैरसोय टाळावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.