मुंबई

दहिसर नाका परिसराची महापौरांकडून पाहणी

CD

दहिसर नाका परिसराची महापौरांकडून पाहणी
मुंबई, ता. २२ : मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहिसर चेकनाक्याला महापौर रितू तावडे यांनी आज भेट दिली. तसेच तेथील समस्यांची पाहणी करीत स्थानिकांशी संवाद साधला.
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक तीनचे भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी केलेल्या विनंतीवरून महापौर रितू तावडे यांनी दहिसर दौरा केला. या वेळी तिथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी महापौरांनी केली. मुंबईत प्रवेश करणाऱ्या चार मार्गांवर चार प्रवेशद्वार उभारण्याचा मनोदय महापौरांनी पहिल्याच सर्वसाधारण सभेत व्यक्त केला आहे. त्यातील एक मुंबई प्रवेशद्वार दहिसर चेकनाका येथे उभारण्याबाबत महापौरांनी या दौऱ्यात चर्चा केली.
या परिसरातील विविध समस्यांबाबत व चेकनाक्याशेजारील महापालिकेचे मैदान जनतेला उपलब्ध करून देण्यासंदर्भातही महापौरांनी चर्चा केली. या वेळी टोलनाक्यावर मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांना उद्भवणाऱ्या समस्याही रितू तावडे यांनी जाणून घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपवर गंभीर आरोप

MI vs PBKS Live: खतरनाक थ्रो! श्रेयस अय्यरने 'चेंडू' वेगाने फेकला, पंजाबच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला... सोडावं लागलं मैदान

Congress Row : काँग्रेसचे टेन्शन वाढलं ! राज्यातील बडा नेता नाराज, थेट पक्ष सोडण्याचा दिला इशारा

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आधारित 'मिशन मुंबई' चित्रपट मोठ्या पडद्यावर, अजय शर्मा मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT