मुंबई

‘एसटी’च्या ‘स्मार्ट कार्ड’ची घोषणा

CD

‘एसटी’च्या ‘स्मार्ट कार्ड’ची घोषणा
विविध सामाजिक सवलतींसाठी अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : एसटीचा प्रवास आता खऱ्या अर्थाने ‘हायटेक’ होणार आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याची नुकतीच घोषणा केली असून, यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी हे ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य असणार आहे.
​एसटीच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे आता प्रवाशांना खिशात रोख रक्कम किंवा सुट्ट्या पैशांची चिंता बाळगण्याची गरज उरणार नाही. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सवलतींची अचूक नोंद ठेवण्यासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी हातमिळवणी केली आहे. हे कार्ड केवळ प्रवासासाठीच नाही, तर डिजिटल व्यवहारांचे एक भक्कम माध्यम ठरणार आहे.
...
​कोणाला, कसे मिळणार कार्ड?
​समाजातील सर्वच घटकांना या योजनेअंतर्गत डिजिटल प्रवासाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. ​शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी लिंक केलेले कार्ड मिळेल. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसाधारण ज्येष्ठांना त्यांचे आधार कार्ड जोडून हे कार्ड प्राप्त करता येईल. दिव्यांगांना त्यांच्या यूडीआयडी क्रमांकाचा वापर करून विशेष सुविधेचे कार्ड दिले जाईल. पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या विभागीय कार्यालयामार्फत याचे वितरण केले जाणार आहे.
...
रिचार्जला सोपे
​प्रवाशांच्या सुविधेसाठी हे कार्ड अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिले आहे. नवीन कार्डची किंमत १९९ रुपये असेल; मात्र ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड आहे, त्यांना ते जमा केल्यास केवळ १४९ रुपयांत नवीन कार्ड मिळेल. कार्डमध्ये किमान १०० रुपयांचा बॅलन्स ठेवणे आवश्यक असून, ५० रुपयांच्या पटीत ते रिचार्ज करता येईल. प्रवाशांना बसमधील मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज करता येणार आहे.
...
बस स्थानकांवरच प्रक्रिया
​नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ३,०००हून अधिक एजंटची नियुक्ती करण्यात आली असून, बस स्थानकांवरच ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही कोणताही त्रास होणार नाही. सुट्ट्या पैशांची चिंता आता इतिहासजमा होणार आहे, असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Latest Marathi News Live Update: अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

SCROLL FOR NEXT