मुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेरील वाहतूक कोंडी; १ लाख वाहनचालकांना मिळणार टोलचा परतावा

CD

एक लाख वाहनचालकांना मिळणार टोलचा परतावा
एमएसआरडीसीची तयारी; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वाहतूक कोंडी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात गॅस टॅंकर उलटल्याने फेब्रुवारीच्या पहिल्याचा आठवड्यात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एक लाख वाहनधारकांना खुशखबर आहे. त्यांना पाच कोटी १६ लाख रुपयांचा टोल परत करण्याची एमएसआरडीसीचा विचार आहे. त्यामुळे संबंधित वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३ फेब्रुवारीला खंडाळा घाट सेक्शनमध्ये एक गॅस टँकर उलटल्याने ३३ तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना पाणी, अन्न व इतर मूलभूत सुविधांची टंचाई भासली. दरम्यान, अपघातानंतर प्रशासनाने टोल संकलन ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिले. मात्र त्याआधी अनेक वाहनचालकांच्या फास्ट टॅग खात्यातून टोल रक्कम कपात झाली होती. त्यामुळे टोल संकलन थांबवण्याचा आदेश दिल्यानंतरही वाहनमालकांकडून वसूल झालेली संपूर्ण रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम पाच कोटी १६ लाखांच्या घरात असून, ती पुढील काही दिवसांत प्रभावित वाहनमालकांच्या फास्ट टॅग खात्यात थेट जमा केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, Viral Video: गौतम गंभीरने लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्याचे कान उपटले... अरे तुला चेंडू तिथे टाकायची काय गरज!

धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Maharashtra Education News: आरटीईच्या नवीन नियमांमुळे पालकांची कोंडी; नव्या अटींमुळे अनेक जण प्रवेशापासून दूर राहण्याची शक्यता!

Metro Pillar: मुंबई मेट्रो पिलर क्रॅक प्रकरण; व्हीडिओ पोस्ट करत एमएमआरडीएने दिले स्पष्टीकरण, दावे फेटाळत सत्य सांगितलं!

दहावीच्या परीक्षेत १० विद्यार्थी बोगस! केंद्र मंगळवेढ्यात अन्‌ विद्यार्थी बेळगाव, सांगली, कोल्हापूरचे; दाढी- मिशीमुळे पर्यवेक्षकास आला संशय अन्‌...

SCROLL FOR NEXT