मुंबई

मुंबईचा पारा ३४.५ अंशांवर

CD

मुंबईचा पारा ३४.५ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २३ : फेब्रुवारीच्या उत्तरार्धात मुंबईसह राज्यभरात उन्हाचा चटका बसू लागला आहे. सोमवारी (ता. २३) मुंबईच्या उपनगरात तापमानाचा पारा ३४.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यात सर्वाधिक ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) ही आकडेवारी जारी केली आहे.

​हवामान खात्याच्या नोंदीनुसार, सोमवारी सांताक्रूझ केंद्रावर कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ६० टक्के नोंदवण्यात आली. कुलाबा येथे ३३ अंश सेल्सिअस तापमान आणि ६८ टक्के आर्द्रता होती. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातही उन्हाची तीव्रता जास्त होती.

राज्याचा विचार करता उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक जाणवत आहे. जळगाव येथे ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हे राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. त्यापाठोपाठ सोलापूर ३५.४ अंश, पुणे ३४.५ अंश आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ३४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. रत्नागिरी (३२.८ अंश) आणि अलिबाग (३१.२ अंश) या कोकण किनारपट्टीच्या भागातही तापमानात वाढ झाली आहे. मुंबईत सायंकाळी धूसर वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
​ऊन वाढत असताना राज्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. बीडमध्ये १.०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, धाराशिव, सातारा आणि पुणे परिसरात आकाश अंशतः ढगाळ होते.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : निफाड तालुक्यातील दुर्दैवी घटनेनंतर आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT