मुंबई

‘आयएनएस अंजदिप’ होणार दाखल

CD

‘आयएनएस अंजदीप’ होणार दाखल
भारतीय नौदलात स्वदेशी तंत्रज्ञानाची ताकद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : भारतीय नौदलाच्या पाणबुडीविरोधी क्षमतेत भर घालणारी ‘अंजदीप’ ही अत्याधुनिक युद्धनौका २७ फेब्रुवारीला चेन्नई बंदरात नौदलात औपचारिकरीत्या दाखल होणार आहे. आठ जहाजांच्या ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट’ (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील ही तिसरी युद्धनौका आहे. या समारंभाला नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत.
‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित युद्धनौका बांधणीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कोलकात्यातील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) या सरकारी शिपयार्डमध्ये ‘अंजदीप’ची निर्मिती करण्यात आली आहे. किनारपट्टी व उथळ समुद्री भागातील लढाईसाठी ही युद्धनौका विशेषतः तयार करण्यात आली आहे. सुमारे ७७ मीटर लांबीच्या या युद्धनौकेत अत्याधुनिक पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्रे व सेन्सर प्रणाली बसविण्यात आली आहे. ‘हुल माउंटेड सोनार अभय’ प्रणालीद्वारे समुद्रातील पाणबुड्या शोधणे, त्यांचा मागोवा घेणे आणि त्यांना निष्प्रभ करणे शक्य होणार आहे.
...
अत्याधुनिक शस्त्रसज्जता
हलक्या प्रकारच्या टॉरपीडो आणि एएसडब्ल्यू रॉकेट्सने ही नौका सज्ज आहे. जलद हालचालीसाठी वॉटर-जेट प्रोपल्शन प्रणाली बसविण्यात आली असून, ती ताशी सुमारे २५ नॉट्स वेगाने धावू शकते. पाणबुडीविरोधी कारवाईव्यतिरिक्त किनारी सुरक्षा, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा तसेच शोध व बचाव मोहिमांसाठीही ‘अंजदीप’चा वापर होणार आहे.
...
ऐतिहासिक नाव
कारवार किनाऱ्याजवळील ऐतिहासिक ‘अंजदीप’ बेटाच्या नावावरून या युद्धनौकेला ‘अंजदीप’ असे नाव देण्यात आले आहे. या नौकेच्या समावेशामुळे विशेषतः तमिळनाडू व पुदुच्चेरी किनारपट्टीसह देशाच्या सागरी सुरक्षेला आणखी बळकटी मिळणार असल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT