मुंबई

‘टॉवर-१’मधील सदनिका वितरण सोडतीला स्थगिती

CD

बीडीडी चाळ पुनर्विकासाचे प्रकरण

‘टॉवर-१’मधील सदनिका
वितरण सोडतीला स्थगिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील टॉवर क्रमांक १ मधील घरांच्या वितरणाबाबत निर्माण झालेल्या वादाची नुकतीच दखल उच्च न्यायालयाने घेतली. पुढील आदेशापर्यंत सोडतीला स्थगिती दिली. त्याच वेळी म्हाडाला याचिकाकर्त्याच्या पात्रतेचा तपशील सादर करण्याचे आदेश देताना भूमिका मांडण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली.

बीडीडी चाळ क्रमांक १२, १३, १४, १५, २१ आणि २९ मधील एकूण ३२९ कुटुंबीयांनी ही याचिका दाखल केली आहे. २०२१च्या आराखड्यानुसार या कुटुंबांना टॉवर-१मध्ये घरे मिळणार होती. २०२५मध्ये म्हाडाने आराखड्यात बदल करून टॉवर १मधील घरे पोलिसांना देण्याचा निर्णय घेतला. हा बदल कोणतीही पूर्वसूचना न देता आणि राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

२०२१च्या आराखड्यानुसारच टॉवर १मध्ये घरे देण्याची मागणी केली. गेल्या ९० वर्षांपासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या कुटुंबांना अन्य टॉवरमध्ये हलवण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांतर्फे वकील नंदकुमार बागवे यांनी केला. त्यांच्या युक्तिवादाची आणि
उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन सोडतीला पुढील आदेशापर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली.

काय प्रकरण?
प्रकल्पानुसार सुमारे १० हजार घरांचा पुनर्विकासासाठी २०२१मध्ये म्हाडाने आराखडा तयार केला. त्यात कोणत्या इमारतींतील रहिवाशांना कोणत्या टॉवरमध्ये घरे मिळणार याचा तपशीलही नमूद केला होता. या आराखड्यानुसार टॉवर क्रमांक ३ आणि ५ मध्ये पोलिसांना घरे दिली जाणार होती. अचानक टॉवर १ मध्ये पोलिसांना घरे मिळणार असल्याचे म्हाडाने जाहीर करून कोणतीही आगाऊ नोटीस न देता २०२१चा आराखडा रद्द केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

SCROLL FOR NEXT