मुंबई

एमआरआय मशीनची प्रतीक्षा संपणार

CD

एमआरआय मशीनची प्रतीक्षा संपणार
सायन, केईएम, नायर, कूपरमध्ये ३-टेस्ला बसवण्याची प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना पाच ते सहा महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. आता ही परिस्थिती बदलणार असून, पुढील सहा महिन्यांत अत्याधुनिक एमआरआय मशीन कार्यान्वित करण्याचे प्रशासनाने नियोजन आहे.
महापालिका संचलित सायन, केईएम, नायर आणि कूपर रुग्णालयात दररोज सुमारे पाच ते सहा हजार रुग्ण उपचारासाठी येतात. त्यापैकी अनेक रुग्णांना एमआरआय तपासणीची आवश्यकता असते. काही महिन्यांपासून यंत्रणा नादुरुस्त असल्याने रुग्णांना चार ते पाच महिने प्रतीक्षा करावी लागत होती. काही रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी खासगी केंद्रांवर जावे लागत होते. महापालिकेच्या रुग्णालयांत एमआरआय तपासणीचा खर्च सुमारे १,००० ते १,२०० रुपये इतका आहे; तर खासगी केंद्रांमध्ये हीच तपासणी ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता.
एमआरआय निविदा प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, ‘लेटर ऑफ इंटेंट’ जारी करण्यात आले आहे. करारानुसार १८० दिवसांच्या आत संबंधित रुग्णालयांमध्ये मशीन कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. मागील दोन ते अडीच वर्षे टेंडरला प्रतिसाद न मिळाल्याने प्रक्रिया रखडली होती. तांत्रिक अटी सुलभ केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली. मशिन्स जर्मनीहून आयात करण्यात येणार असून, करारानुसार सहा महिन्यांच्या आत त्या कार्यान्वित होतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

एमआरआय निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, १८० दिवसांच्या आत सर्व संबंधित रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक मशीन कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. ‘टर्नकी प्रोजेक्ट’ अंतर्गत सर्व कामे वेगाने सुरू आहेत. गरीब रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती पर्यायी व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
- डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त

३-टेस्ला अत्याधुनिक मशीन खरेदीचा निर्णय
महापालिकेने केंद्रीय खरेदी प्रक्रियेद्वारे सायन, केईएम, नायर आणि कूपर रुग्णालयांसाठी अत्याधुनिक ३-टेस्ला एमआरआय मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया ‘टर्नकी प्रोजेक्ट’ पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जुन्या मशीन काढणे, नवीन मशीन बसविणे तसेच आवश्यक सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल कामे एकत्रितपणे पूर्ण केली जात आहेत.

तात्पुरती पर्यायी व्यवस्था
नवीन मशीन कार्यान्वित होईपर्यंत गरजू रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक एमआरआय आणि सीटी-स्कॅन केंद्रांशी तात्पुरता करार करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात तपासणी उपलब्ध करून दिली जात आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

Rohit Sharma: चाहत्याने त्याच्या मुलीचे नाव समायरा ठेवले, रोहितला जेव्हा हे समजले, तेव्हा... VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरच्या नगर–मनमाड महामार्गावर भीषण अपघात; ४ ते ५ जण गंभीर जखमी

MLA Amol Mitkari : अजितदादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करा; आमदार अमोल मिटकरी यांची अधिवेशनात मागणी

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

SCROLL FOR NEXT