पुण्यश्लाेक अहिल्यादेवी होळकर
यांचे बेलासिस पुलाला नाव
मुंबई, ता. २५ : दक्षिण मुंबईतील बेलासिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्याचे कौशल्य विकास तथा मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याबाबत सतत पाठपुरावा केला होता. या ब्रिटिशकालीन पुलाचे नाव मेजर जनरल जॉन बेलासिस असे होते. मुख्यमंत्र्यांनी या पुलाचे नाव बदलल्यामुळे लोढा यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
या पुलाची पुनर्बांधणी आता पूर्ण झाली असून, फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २६) फेब्रुवारीला या पुलाचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. यासंदर्भात लोढा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना गेल्या वर्षी जुलैमध्ये महापालिकेने मुंबईतील जुन्या कर्नाक पुलाचे ‘सिंदूर ब्रिज’ असे नामांतरण केल्याची आठवण करून दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे नाव या पुलाला दिल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कौशल्य विभागानेही राज्यातील सर्व आयटीआयला थोर संत आणि महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय आधीच घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.