मुंबई

मुंबईभर रंगणार रंगांचा उत्सव!

CD

मुंबईभर रंगणार रंगांचा उत्सव!
महापौर बालचित्रकला स्पर्धा यंदा १ मार्चला

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २६ : जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त, महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘महापौर बालचित्रकला स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही भव्य स्पर्धा रविवारी (ता. १) सकाळी ८ ते ११ या वेळेत मुंबईतील ५१ विविध मैदाने आणि उद्यानांमध्ये पार पडणार आहे.
मुंबईतील विविध शाळांमधील सुमारे एक लाख विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असून, ज्या विद्यार्थ्यांनी आगाऊ नोंदणी केलेली नाही, त्यांना स्पर्धेच्या दिवशी प्रत्यक्ष केंद्रावर येऊनही प्रवेश घेता येणार आहे. महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर आणि पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. ​शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या रंगांच्या उत्सवात सहभागी होऊन आपल्या कल्पकतेने मुंबई सजवावी, असे आवाहन पालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे. महापालिकेच्या शाळांपर्यंत याबाबत माहिती पोहोचवण्यात आली असून अन्य शाळांतील विद्यार्थीही सहभागी होऊ शकणार आहेत.
...
भरघोस बक्षिसे
​विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालिकेने यंदा भरघोस बक्षिसे जाहीर केली आहेत.​ प्रथम क्रमांकास २५ हजार रुपये, पदक व प्रशस्तिपत्र; ​द्वितीय क्रमांकास २० हजार रुपये, पदक व प्रशस्तिपत्र आणि ​तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये, पदक व प्रशस्तिपत्र असे स्वरूप असणार आहे. ​उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार असून गटातील १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये, ​विभाग स्तर २५ प्रशासकीय विभागांतील ६२५ उत्तम चित्रांना प्रत्येकी ५०० रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
...
​स्पर्धकांचे गट ------ विषय
​गट १ (पहिली-दुसरी) : माझा चांदोमामा, माझी मनीमाऊ, मी माझ्या घरात
​गट २ (तिसरी-चौथी) : मी झाडावर चढतो, मी फुलांच्या बागेत, मी आईसोबत लाडू बनवितो
​गट ३ (पाचवी-सहावी) : आम्ही जंगलात फिरतो, आम्ही परग्रहावर, आम्ही शिवरायांचे मावळे
​गट ४ (सातवी-आठवी) : आम्ही नदीच्या पाण्यात पोहतो, आमची वेषभूषा स्पर्धा, माझा आवडता मैदानी खेळ
​गट ५ (नववी) : पर्यावरण संवर्धन, माझी प्रगतिशील सुंदर मुंबई, गडसंवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT