होळीला ‘पुरणपोळी’ घरपोच
पालिकेच्या महिला बचत गटांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : होळीनिमित्त मुंबईकरांना अस्सल पारंपरिक चवीची पुरणपोळी खाता यावी, यासाठी महापालिकेने ‘पुरणपोळी महोत्सव २०२६’चे आयोजन केले आहे. पालिकेच्या अर्थसहाय्याने चालणाऱ्या महिला बचत गटांमार्फत तयार केलेल्या या पुरणपोळ्या नागरिकांना ऑनलाइन नोंदणीद्वारे थेट घरपोच मिळणार आहेत.
मुंबईतील गरजू आणि होतकरू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महापालिकेने विविध बचत गटांची स्थापना केली आहे. या महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पालिकेने आता डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला आहे. यापूर्वीच्या ‘मोदक महोत्सवा’ला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, आता होळीसाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.
अशी करा नोंदणी
ज्या नागरिकांना या पुरणपोळ्यांचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यांनी https://shgeshop.com या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करायची आहे. नोंदणीसाठी २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
हक्काचा रोजगार
ऑनलाइन नोंदणी केलेल्या ग्राहकांना होळीच्या दिवशी, म्हणजेच मंगळवार, ३ मार्चला पुरणपोळ्यांचे घरपोच वितरण केले जाईल, अशी माहिती नियोजन संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली. या उपक्रमामुळे मुंबईकरांची सणाची धावपळ कमी होणार असून, महिला बचत गटांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.