मुंबई

मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्याचे शासनाचे प्रयत्न – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

CD

मराठी शाळांमधील पटसंख्या
वाढविण्याचे शासनाचे प्रयत्न ः दादा भुसे

मुंबई, ता. २७ : मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देऊन पालकांचा शासकीय शाळांवरील विश्वास दृढ करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी गणवेश, पाठ्यपुस्तक आदी सुविधा वेळेवर मिळाव्यात, शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, प्रयोगशाळा, वाचनालय आणि खेळाची मैदाने असावीत यावर भर देण्यात येत आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर पदे भरण्याबाबत विधानसभा सदस्य विक्रम पाचपुते यांनी प्रश्न उपस्थित केला. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात चर्चा करताना सांगितले, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ आणि ‘पीएम श्री शाळा’ या योजनांच्या माध्यमातून शाळांचे आधुनिकीकरण सुरू आहे. तसेच, शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत १५,००० पेक्षा अधिक शिक्षकांची भरती ‘पवित्र पोर्टल’द्वारे पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे आणि येणाऱ्या काळात कला, क्रीडा विषयाचे शिक्षकही नेमले जातील, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.
मराठी भाषेच्या संदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे हे बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल. येत्या दोन वर्षांत म्हणजे २०२६-२७ पर्यंत राज्यातील मराठी शाळांमधील पटसंख्या किमान २५ टक्क्यांनी वाढलेली दिसेल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. या चर्चेत विधानसभा सदस्य अस्लम शेख, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT