मुंबई

कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या

CD

कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या
बहिणीच्या पतीविरोधात गुन्हा नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः दारुड्या पतीच्या मारहाणीतून बहिणीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची हत्या झाली. रविवारी रात्री विलेपार्ले येथील शास्त्रीनगर परिसरात घडली. सागर गुप्ता (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बहिणीचा पती आकाश मौर्यविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सागरची बहीण ममता (२६)चे २०२१ला आकाशसोबत लग्न झाले. आकाशला दारूचे व्यसन होते. तो नशेत क्षुल्लक कारणावरून ममताला वरचेवर मारझोड करी. वाद विकोपाला गेले, मारहाणीने गंभीर वळण घेतले की सागर किंवा त्याची आई दोघांमध्ये मध्यस्थी करून वेळ मारून नेत.
रविवारी रात्रीही आकाशने नशेत ममताला मारहाण सुरू केली. नेमका सागर तेथेच होता. तो मध्ये पडला आणि आकाशसोबत त्याची झटापट सुरू झाली. दरम्यान, आकाशने धारदार चाकू सागरच्या गळ्यावर फिरवला. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून भानावर आलेला आकाश तेथून पसार झाला. सागरला तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT