मुंबई

आखाती देशातील प्रवाशांनी गाठली मुंबई

CD

आखाती देशातून नऊ विमाने दाखल
राज्यात सुरक्षित परतल्याने सुटकेचा निश्वास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता ३ : इराण-इस्राईल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे विमानसेवेवर परिणाम झाला आहे. आखाती देशात महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी, पर्यटक आणि प्रवासी अडकले होते. अडकलेल्या नागरिकांना घेऊन विशेष विमानाने मुंबईत दाखल होत आहेत. रविवारी रात्री अबुधाबीहून पहिले विमान मुंबईत सुमारे ३५० प्रवाशांना सुरक्षित घेऊन आले. त्यानंतर मंगळवारी दिवसभरात पाच विमाने मुंबई विमानतळावर उतरली. बुधवारी (ता. ४) चार विशेष विमाने मुंबईत दाखल होणार आहेत. राज्यात सुरक्षित परतल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
मुंबई विमानतळावर मंगळवारी इमिरटस इके ५०६ (दुबई ते मुंबई) हे विमान दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी आले. त्यानंतर स्टार एअरची दोन विमाने संध्याकाळी साडेसात आणि रात्री ९ वाजता दुपारी फुजैरा विमानतळावरून मुंबईत आली. या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल झाली. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश होता. याशिवाय इंडिगोची दोन विमाने जोद्दाहवरून मुंबईत दाखल झाली. दुबईला पर्यटनासाठी कोल्हापूरच्या २९ प्रवाशांचा गट मंगळवारी कोल्हापुरात दाखल झाला. आपल्या हॉटेलजवळच बॉम्बस्फोट झाल्याचे या पर्यटकांनी सांगितले.

बॉम्बस्फोट आवाज ऐकला
दुबई विमानतळाला येत असतानादेखील वाटेत बॉम्बस्फोट झाल्याचा आवाज ऐकल्याचेही सांगितले. सुदैवाने आपण मायदेशी परतल्याचा आनंद या पर्यटकांनी व्यक्त केला. बुधवारी रॉयल जॉर्डनियन विमान कंपनी, गल्फ एअर आणि स्पाईस जेटची दोन विमाने फुजैराह आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईत दाखल होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: खार स्टेशनजवळ दोन इसम चालत्या ट्रेनमधून पडले

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT