मुंबई

राज्यात प्रत्येक तिसरा नागरिक उच्च रक्तदाबग्रस्त

CD

राज्यात प्रत्येक तिसरा नागरिक उच्च रक्तदाबग्रस्त
विशेष तपासणीत २५.८२ लाख जणांची चाचणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यभर राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार (एनसीडी) विशेष तपासणी मोहिमेत ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उच्च रक्तदाबाचा वाढता धोका समोर आला आहे.
१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मिशन पद्धतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण २५ लाख ८२ हजार ९९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे १० लाख पाच हजार म्हणजेच जवळपास ३८ टक्के नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला आहे. या निष्कर्षानुसार राज्यातील प्रत्येक तिसरा नागरिक उच्च रक्तदाबाने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित सर्व रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करून आवश्यक औषधे देण्यात आली आहेत. या मोहिमेत तोंड, स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचीही व्यापक तपासणी करण्यात आली. ही राज्यस्तरीय मोहीम सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत ठरविलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम युद्धपातळीवर राबविले जात आहेत.
मोहिमेदरम्यान मधुमेहाचीही मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली. एकूण १२ लाख ५२ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली असता, त्यापैकी दोन लाख ८८ हजार जण मधुमेहग्रस्त आढळले. म्हणजेच तपासणी झालेल्या सुमारे २३ टक्के नागरिकांमध्ये मधुमेहाची पुष्टी झाली असून, जीवनशैलीशी संबंधित आजारांचे वाढते ओझे अधोरेखित झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, निष्क्रिय जीवनशैली, अयोग्य आहार, स्थूलता, तंबाखूचे सेवन, मद्यपान आणि वाढता ताण ही उच्च रक्तदाब व मधुमेह वाढण्यामागील प्रमुख कारणे आहेत. उपचार न झाल्यास हृदयविकाराचा झटका, मेंदू आघात, मूत्रपिंडाचे विकार आणि इतर गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेळेत तपासणी करून उपचार सुरू करणे अत्यावश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

Nagpur News: खोलीत सापडला ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह; नारातील धक्कादायक घटना, परिसरात खळबळ

"माझं करिअर सासरच्या लोकांमुळे घडलं" सासू-सासऱ्यांबद्दल मराठी अभिनेत्री व्यक्त; 26 व्या झालेलं नवऱ्याचं निधन

Latest Marathi News Live Update : वाशिम जिल्ह्यात विद्युत वाहिनीच्या तारे मधून घर्षण होऊन 2 एकर गहू पिकाची राखरांगोळी

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT