मुंबई

आभासी अटकेबाबत सायबर पोलिसांकडून जनजागृती

CD

आभासी अटकेबाबत सायबर पोलिसांकडून जनजागृती
पश्चिम उपनगरात एकाकी राहणाऱ्या ५६७ ज्येष्ठ नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः आभासी अटक आणि त्यानिमित्ताने कोट्यवधींची आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांनी पुन्हा डोके वर काढल्याने सायबर पोलिसांनी शहरात आक्रमकरीत्या जनजागृती हाती घेतली आहे. शनिवारी (ता. ७) पाचही प्रादेशिक विभागांतील अधिकारी, अंमलदारांनी पश्चिम उपनगरात एकाकी राहणाऱ्या वृद्धांचे घर गाठून आभासी अटकेचे गुन्हे कसे घडतात, फसवणूक कशी होते आणि ती कशी टाळावी, याबाबत मार्गदर्शन केले.
सायबर पोलिसांनी उत्तर मुंबईपासून सुरुवात केली. या भागात एकाही राहणाऱ्या वृद्धांची माहिती मिळवून सायबर पोलिसांची पथके वृद्धांच्या घरी धडकली. सुमारे ५६७ वृद्धांशी पोलिसांनी प्रत्याक्ष संवाद साधला. आभासी अटकेची सुरुवात एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून प्राप्त अनोळखी व्यक्तीच्या कॉलने होते. ही व्यक्ती स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भावतो आणि आर्थिक गैरव्यवहार, दहशतवादाला खतपाणी आदी निमित्ते पुढे करून अटकेची भीती घालतो.
पोलिस ठाणे, न्यायालयीन कारवाईचा आभास उभा करतो आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासाच्या निमित्ताने लक्ष्य केलेल्या वृद्धाकडील सर्व जमापुंजी स्वतःशी संबंधित खात्यांवर वळती करून घेतो. ही प्रक्रिया पार पडेपर्यंत वृद्ध, त्याचा कुटुंबातील सदस्यांना घरातील एका खोलीत बंदिस्त करून घेण्यास, बाहेरच्या जगाशी संपर्क तोडण्यास भाग पाडतो. तसेच व्हॉट्सॲप किंवा अन्य समाजमाध्यमांद्वारे कॉल सुरूच ठेवून त्यांच्या प्रत्येक हालचाली टिपतो. अशा प्रकारे अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास तो स्वीकारू नका, असे आवाहन या भेटींदरम्यान पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांना केले.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन
- पोलिस, सीबीआय, ईडी आदी कोणतीही तपास यंत्रणा आभासी अटक करत नाही. कायद्यात आभासी अटक अशी कोणतीही तरतूद नाही.
- अनोळखी व्यक्तींचे व्हिडिओ कॉल स्वीकारू नका. अशा कॉलनंतर कधीही पैसे पाठवू नका. कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या वागण्यात किंवा मूडमध्ये बदल दिसल्यास त्याकडे लक्ष द्या.
- जर तुम्ही अशा प्रकारे फसवले गेले असाल, तर आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि अन्य नातेवाइकांना त्वरित माहिती द्या.
- तुम्हाला डिजिटल अटकेबद्दल कोणताही कॉल आल्‍यास लगेच जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा. मदतीसाठी १००/१९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. किंवा www-cybercrime-gov.in यावर तक्रार नोंदवता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Investment Plans: महिलांना भविष्यात आर्थिक टेन्शन नको? मग या 7 ठिकाणी गुंतवणूक केली तर तयार होईल मोठा फंड

Ration Card: केंद्र-राज्य सरकारचा मोठा निर्णय! रेशनकार्डचे 'हे' ५ नियम बदलले; यादीतून नाव काढले जाणार? जाणून घ्या नवे निकष...

Viral Video : सुनील गावस्करांनी वचन पाळले, टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवसोबत 'झिंगाट' डान्स...

हाणामारी होण्याइतकं सलमान शाहरुखमध्ये झालेलं कडाक्याचं भांडण, अभिनेता स्वत: खुलासा करत म्हणाले... 'वादाचं मुख्य कारण....'

Latest Marathi News Live Update : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात अपघातात विद्यार्थ्याचा डोळा निकामी

SCROLL FOR NEXT