गॅस सिलिंडरचा काळा बाजारा करणाऱ्याविरोधात मनसे आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः वाढत्या मागणीचा फायदा घेऊन गॅस सिलिंडरचा काळा बाजार करणाऱ्या गॅस वितरकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिला आहे. ‘गॅस वितरकांनी ग्राहकांची फसवणूक करून गॅस सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांना मनसेस्टाइलने धडा शिकवला जाईल,’ असा आक्रमक पवित्रा मनसे नेते मनोज चव्हाण यांनी घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गॅस वितरणाबाबत तक्रारी समोर येत आहेत. अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करण्यासाठी काळ्या बाजारातून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास असून परिणामी सर्वसामान्यांना वेळेवर सिलिंडर मिळत नाही किंवा जादा दराने तो खरेदी करावी लागत आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ‘सामान्य जनतेच्या हक्काचा गॅस चोरून तो चढ्या दराने विकण्याचे प्रकार काही वितरकांकडून सुरू आहेत. गॅस सिलिंडर ही अत्यावश्यक सेवा आहे आणि त्यात भ्रष्टाचार करणे म्हणजे सामान्यांच्या चुलीवर घाला घालण्यासारखे आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असले तरी मनसे गप्प बसणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला. ‘आम्ही प्रत्येक प्रभागात लक्ष ठेवून आहोत. जर कुठेही ग्राहकांची लूट होत असल्याचे आढळले, तर मनसेचे कार्यकर्ते थेट संबंधित वितरकाच्या कार्यालयावर धडक देतील,’ असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.