मुंबई

मुंबईकरांना मोठा दिलासा!

CD

मुंबईकरांना मोठा दिलासा!
तापमानाचा पारा ४२ अंशांवरून ३६ वर
​मुंबई, ता. ११ : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या चटक्याने होरपळणाऱ्या मुंबईकरांना बुधवारी (ता. ११) काहीसा दिलासा मिळाला. मुंबईतील काही भागांत मंगळवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचलेला होते तर आज पारा ३६ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. २४ तासांच्या अंतराने तापमानात सुमारे पाच ते सहा अंशांची लक्षणीय घट झाल्याने मुंबईवरील ‘हीटवेव्ह’चे सावट सध्यातरी ओसरले आहे. मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी राम मंदिर परिसरात ४२ अंश सेल्सिअस झाली होती; मात्र आज हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार येथे ३६.२ अंश तापमान नोंदवले गेले. तीच स्थिती सांताक्रूझमध्येही पाहायला मिळाली. आज विक्रोळीमध्ये ३६.९ अंश, विद्याविहारमध्ये ३४.५ अंश आणि भायखळा येथे ३४.१ अंश तापमानाची नोंद झाली. दहिसरमध्येही पारा ३३ अंशांवर स्थिरावला होता. ​तापमानाचा आकडा खाली आला असला तरी मुंबईकरांची घामापासून सुटका झालेली नाही. सांताक्रूझमध्ये ८१ टक्के आणि कुलाबा येथे ८० टक्के इतकी उच्च आर्द्रता नोंदवण्यात आली आहे. हवेतील या ओलाव्यामुळे नागरिकांना प्रत्यक्षात उकाडा जास्त जाणवत आहे. ​हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे तापमानात ही घट झाली आहे. पुढील काही दिवस तापमानात असेच चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT