मुंबई

डॉक्टरांवरील हल्ल्याचा आयएमएकडून तीव्र निषेध

CD

डॉक्टरांवरील हल्ल्याचा आयएमएकडून तीव्र निषेध
सुरक्षा वाढविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रने तीव्र निषेध नोंदवला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
अकोला येथील डॉ. प्रमेश सरनाईक, डॉ. शुभम सेनी तसेच रुग्णसेवक सुशील मेढे यांच्यावर एका रुग्णाच्या नातेवाइकांनी सलाईनच्या स्टॅंडचा वापर करीत हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत डॉ. सरनाईक जखमी झाले. रुग्णालयाच्या नियमांनुसार वैद्यकीय कागदपत्रे देणे शक्य नसतानाही केवळ त्या कारणावरून डॉक्टरांवर हल्ला झाल्याने आरोग्य क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आयएमए-ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्कने (महाराष्ट्र) या घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत तातडीने वाढ करण्याची गरजही संघटनेने अधोरेखित केली आहे.
...
विविध मागण्या
- रुग्णालयात पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे
- संवेदनशील विभागांमध्ये सीसीटीव्ही देखरेख वाढविणे
- डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ एफआयआर नोंदवून कठोर कारवाई करणे
- डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र प्रोटोकॉल तयार करणे
...
डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना शून्य सहनशीलता असली पाहिजे. अकोला येथे घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. डॉक्टर हे अहोरात्र रुग्णसेवेत कार्यरत असतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
- डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

SCROLL FOR NEXT