मुंबई

अतिधोकादायक ९६ उपकर प्राप्त इमारती सक्तीने रिकाम्या करणार

CD

अतिधोकादायक ९६ उपकर प्राप्त इमारती सक्तीने रिकाम्या करणार
अपघात टाळण्यासाठी म्हाडाचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर २०२५ मध्ये म्हाडाने मुंबई शहरातील उपकर प्राप्त (सेस) इमारतींच्या केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ९६ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या होत्या. त्यामध्ये जवळपास २,४०० कुटुंबे वास्तव्यास असून, त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने म्हाडाने त्यांना नोटीस पाठवूनही त्यांनी अद्याप इमारती रिकाम्या केलेल्या नाहीत. त्यामुळे या पावसाळ्यात सदर इमारती कोसळून कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून म्हाडाकडून सदरच्या इमारती सक्तीने रिकाम्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे संबंधित रहिवासी काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
म्हाडाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ९६ इमारती अतिधोकादायक ठरल्या होत्या. त्यामधील रहिवाशांना उपलब्ध संक्रमण सदनिका किंवा भाडे दिले जाणार आहे. त्यासाठी संबंधितांनी म्हाडाच्या वॉर्ड कार्यालयात घराचे पुरावे सादर करावेत, असे आवाहन म्हाडाने त्यांना नोटीस पाठवत केले होते. मात्र, रहिवाशांकडून त्याबाबत कोणतेच सहकार्य मिळत नसल्याने अद्यापही संबंधित रहिवासी त्यांच्या अतिधोकादायक असलेल्या इमारतीत वास्तव्यास आहेत. दरम्यान, भविष्यात कोणताही अपघात घडू नये म्हणून सदरच्या इमारती सक्तीने रिकाम्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी त्यांना पुन्हा नोटीस दिल्या जाणार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

संक्रमण सदनिका किंवा भाड्याचा पर्याय
अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याबाबत पुन्हा नोटीस दिल्या जाणार आहेत. त्यानुसार त्यांनी म्हाडाकडे पुरावे सादर करत सदनिका रिकामी केल्यास त्यांना संक्रमण सदनिका किंवा २० हजार रुपये मासिक भाडे हा प्रस्ताव आहे. दरम्यान, आता नोटीस दिल्यानंतरही राहिवाशांनी सदनिका रिकाम्या न केल्यास होणाऱ्या अपघाताला किंवा जीवित-वित्तहानीला तेच जबाबदार असतील, असे अधिकाऱ्या स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SCROLL FOR NEXT