मुंबई

भारतीयांची झोप सर्वात कमी

CD

भारतीयांची झोप सर्वात कमी
औरा कंपनीचा अहवाल

मुंबई, ता. २२ : भारतीय नोकरदार, कर्मचारी यांची झोप जगात सर्वात कमी म्हणजे जेमतेम साडेसहा तास असून, त्यांच्या झोपेचा दर्जाही चांगला नाही. मात्र, भारतीय लोक सोमवारी छोट्या डुलक्या काढण्यात पटाईत आहेत, असे आरोग्यविषयक साधणं बनवणारी कंपनी औरा यांच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
औराचे चीफ मार्केटिंग ऑफिसर डाऊघ स्विनी यांनी नुकतीच ही माहिती दिली. भारतीयांना त्यांच्या झोपेशी संबंधित तसेच अन्य आरोग्यविषयक रोजच्या माहितीवर लक्ष ठेवून त्याचे विश्लेषण सांगणारी अंगठी त्यांनी बाजारात आणली आहे. त्यानिमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते. औराची ही अंगठी ब्लुटूथद्वारे आपल्या मोबाईलला जोडता येते. त्याद्वारे हृदयाच्या ठोक्यांचा वेग, किती पावले चाललो ते तर सांगतेच. मात्र, तुमच्या मनावरील ताण किती आणि कधी वाढला, तुम्ही काय व्यायाम तुमच्या शरीराचे तापमान, हृदयाची गती आणि अन्य लक्षणे पाहून तुम्ही आजारी पडणार का, ते देखील ही अंगठी आधीच सांगते. भारतीयांची सरासरी झोप सहा तास २८ मिनिटे असून, जगातील इतर अनेक देशातील लोक त्याहीपेक्षा ४० मिनिटे जास्त झोपतात. निरोगी माणसासाठी सात ते नऊ तास झोप आवश्यक आहे. मात्र, भारतीयांना त्यांचे काम, रात्री समाजमाध्यमांवर वेळ घालवणे, तसेच रात्रीच अन्य कामांना वेळ देणे, यामुळे झोप कमी मिळते, असे अहवालात म्हटले आहे.
त्यामुळे भारतीयांना गाढ झोप अशी फार मिळतच नाही. तसेच भावभावनांवर नियंत्रण, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेली आर.ई.एम. पद्धतीची झोपही भारतीयांना फारशी मिळत नाही. सरासरी भारतीय सव्वा बारा वाजता झोपायला जातात, मात्र त्यांचा जागे होण्याचा वेळ हा जगातील इतर व्यक्तींप्रमाणेच पावणेआठ हा आहे. अर्थात कमी झोपेची झोपेची कमतरता भारतीय फावल्या वेळात डुलक्या काढून भरून काढतात. डुलक्या काढण्याचा भारतीयांचा दिवसाचा वेळ ५३ मिनिटे हा आहे. सोमवारी हे प्रमाण सर्वात जास्त असते, असेही अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

SCROLL FOR NEXT