Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Iran peace proposal: इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने अधिक जहाजे मध्य अमेरिकेच्या सागरी मार्गाकडे वळत आहेत. पनामा कालव्याच्या महसुलात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Iran Peace Proposal

Iran Peace Proposal

ESakal

Updated on: 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीन शांतता प्रस्ताव फेटाळल्याने पश्चिम आशियातील शांततेच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर, सोमवारी जागतिक तेल किमतींमध्ये मोठी वाढ झाली. ज्यामुळे जवळपास १० आठवड्यांपासून सुरू असलेला हा संघर्ष आणखी बराच काळ चालू राहू शकतो, असे संकेत मिळत आहेत. वॉशिंग्टनकडून चर्चेचा प्रस्ताव मिळाल्यानंतर तेहरानने रविवारी युद्ध संपवण्यासाठी काही अटींसह आपली योजना सादर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com