मुंबई

मलबार हिलमधील ''ग्रीन झोन''च्या आरक्षणात फेरबदल; खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी महापालिकेचा पुढाकार?

CD

‘ग्रीन झोन’च्या आरक्षणात फेरबदल!
​सुधार समितीच्या २५ मार्चच्या बैठकीत निर्णय?

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २१ : मुंबईतील अतिश्रीमंत वस्ती असलेल्या मलबार हिल येथील एका महत्त्वाच्या भूखंडाच्या आरक्षणात फेरबदल करण्याचा घाट मुंबई महापालिकेने घातला आहे. ‘डी’ विभागातील एका खासगी कंपनीच्या बंगल्याखालील ‘ग्रीन झोन’चे (हरित क्षेत्र) आरक्षण रद्द करून ते ‘निवासी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने सुधार समितीसमोर मांडला आहे. या प्रस्तावावर येत्या २५ मार्चला होणाऱ्या सुधार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

​मलबार हिल येथील सीटीएस क्रमांक ८/७३८ (भाग) या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ ४,५९५ चौरस मीटर आहे. यातील उत्तर बाजूकडील ५४२.६५ चौरस मीटर जमीन ‘मेसर्स हरे कृष्णा पॅकेजिंग प्रा. लि.’ या कंपनीच्या मालकीची असून तेथे कंपनीचा बंगला आहे. विकास आराखडा १९६७ नुसार ही जागा ‘स्लोपिंग टेरेन’ (उताराची जमीन) होती. तर १९९१च्या आराखड्यात तिची नोंद ‘ग्रीन हिल स्लोप’ अशी करण्यात आली होती. सध्याच्या २०२४च्या विकास आराखड्यातही हा भूखंड ‘ग्रीन झोन’मध्येच दर्शवण्यात आला आहे.

​संबंधित कंपनीने १८ जून २०२४ मध्ये नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे हे आरक्षण हटवण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने यावर महापालिका आयुक्तांचे अभिप्राय मागवले होते. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर आता हे आरक्षण बदलून जमीन निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सुधार समितीकडे पाठवण्यात आला आहे.

आरक्षण हटवण्यास मंजुरी देणार का?
​महापालिकेच्या माहितीनुसार, ग्रीन झोनमध्ये येणारी ही जागा ‘सीआरझेड-३’अंतर्गतही येत आहे. तसेच, एम. एल. डहाणूकर मार्गावरील वाहतूक विभागाने मंजूर केलेल्या १८.३० मीटर रुंदीच्या रस्ता रेषेचाही यावर परिणाम होत आहे. कंपनीच्या मालकीच्या ५४२.६५ चौरस मीटर जमिनीपैकी २९४.१५ चौरस मीटर भाग थेट ‘ग्रीन झोन’मध्ये बाधित आहे. ​पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ‘ग्रीन झोन’मधील आरक्षण हटवण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि कडक नियमाधीन असते. अशा परिस्थितीत, एका खासगी कंपनीच्या मागणीसाठी पालिका प्रशासन हे आरक्षण हटवण्यास मंजुरी देते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : सहा आमदारांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले

'स्वामी समर्थ'मध्ये सुरू होणार 'महानिर्वाणाचा अध्याय; हे अभिनेते साकारणार प्रौढ स्वामींची भूमिका

Urali Kanchan News : एमआयटी एडीटी–रायन सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञान शिक्षणाची नवी दिशा

SCROLL FOR NEXT