मुंबई

एल्फिन्स्टनच्या रहिवाशांना दादर खेड गल्लीतील घरे मिळणार

CD

एल्फिन्स्टनच्या रहिवाशांना दादरच्या खेड गल्लीतील घरे मिळणार
म्हाडाकडून १० घरांची यादी तयार; ४५४ चौरस फुटांचे क्षेत्रफळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : अँटॉप हिल आणि भायखळा येथील घरे नाकारलेल्या एल्फिन्स्टन पूलबधितांसाठी खुशखबर आहे. म्हाडाने संबंधित १० रहिवाशांना घरे देण्यासाठी दादरच्या खेड गल्लीतील डीआबेरो इमारतीमधील घरे निश्चित केली आहेत. सुमारे ४५४ चौरस फुटांची असलेली ही घरे लवकरच एमएमआरडीएला हस्तांतरित केली जाणार आहेत. त्यामुळे संबंधित रहिवाशांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.
वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन येथे सध्याचा पूल काढून एमएमआरडीएकडून डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे पुलाला लागून असलेल्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित होत आहेत. लक्ष्मी निवास या इमारतीत ६० तर हाजी नुरानी या इमारतीत २३ रहिवासी आहेत. संबंधित रहिवाशांना दादर, प्रभादेवी, वडाळा, लोअर परळ, भायखळा, अँटॉप हिल या भागांतील ७८ घरे एमएमआरडीएने घेत त्यापोटी म्हाडाला ८९ कोटी रुपये दिले आहेत.
१२ रहिवाशांनी अँटॉप हिल आणि भायखळा येथील घरे नाकारली होती. त्यानुसार एमएमआरडीएने म्हाडाकडे ही घरे बदलून देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत म्हाडाने दादरच्या खेड गल्ली येथील डीआबेरो इमारतीमधील १० घरे देण्याची तयारी दर्शविली असून, त्याबाबत लवकरच एमएमआरडीएला पत्र दिले जाणार असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दीड-पावणेदोन कोटी किंमत
म्हाडाकडून दादरच्या खेड गल्लीतील एकाच इमारतीमधील ४५४ चौरस फूट क्षेत्रफळाची घरे एमएमआरडीएला दिली जाणार आहेत. त्या ठिकाणी ३६-४० हजार रुपये एवढा रेडिरेकनरचा दर आहे. त्यामुळे एका सदनिकेची किंमत सुमारे दीड-पावणेदोन कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे याआधी दिलेल्या घरांची किंमत आणि आता दिल्या जाणाऱ्या घरांच्या किमतीमधील फरकाची रक्कम म्हाडा एमएमआरडीएकडून घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

Shabbir Ahmed Ansari Passes Away: ओबीसी नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे निधन; मंत्री छगन भुजबळांसह ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेकडून शोक व्यक्त!

Solapur Textile Industry: सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका; कच्चा माल महागला अन् निर्यात विस्कळित; हजार डॉलरचे शिपमेंट ५ हजारांवर!

Latest Marathi News Live Update : भिवंडीतील कोनगाव येथे भंगार गोदामाला भीषण आग; दोन गोदाम जळून खाक

SCROLL FOR NEXT