मुंबई

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा प्रवासी सुविधा आणि सुरक्षेचा आढावा

CD

प्रवासी सुविधा-सुरक्षेचा आढावा
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीतील रेल भवन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. यात रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि सुरक्षेचा आढावा घेतला. प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास मिळावा, यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
स्थानकांवरील गर्दी नियंत्रण, प्रवेश व्यवस्था, तंत्रज्ञानाच्या मदतीने देखरेख आणि प्रवाशांची हालचाल सुलभ करण्यासाठी आवश्यक सुधारणा लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. हे बदल प्रथम नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येतील. त्यानंतर इतर महत्त्वाच्या स्थानकांवरही ते लागू केले जातील. स्थानकांवरील सर्व कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांचे गणवेश आणि ओळखपत्र अनिवार्य करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
रेल्वे कर्मचारी चमकदार जॅकेट घालतील, तर विक्रेते, कंत्राटी कर्मचारी आणि आयआरसीटीसी कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या रंगांची जॅकेट असतील. सर्वांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. देशातील ७६ प्रमुख स्थानकांवर प्रवाशांसाठी थांबण्याच्या जागांची सुधारणा केली जाणार आहे. तसेच आरक्षित आणि अनारक्षित तिकीटधारकांसाठी वेगळे दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत. गाड्यांची माहिती वेळेवर मिळावी यासाठी माहिती प्रणालीही अधिक सक्षम केली जाणार आहे.

नवी दिल्ली स्थानकावर बदल
नवी दिल्ली स्थानकावर एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे प्लॅटफॉर्म, मुख्य हॉल आणि संवेदनशील भागांवर लक्ष ठेवतील. तसेच क्यूआर कोडवर आधारित प्रवेश व्यवस्था सुरू करण्याचीही तयारी आहे. दिवाळी आणि छठपूर्वी ही व्यवस्था सुरू करण्याचे नियोजन आहे.

‘रेलवन’ ॲपमुळे पुढचा प्रवास सोपा
स्थानकाबाहेर टॅक्सी मिळण्यात होणारा त्रास, जादा भाडे किंवा फसवणूक टाळण्यासाठी ‘रेलवन’ ॲपचे ‘भारत टॅक्सी’ सेवेशी जोडले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडल्यावर लगेच विश्वासार्ह टॅक्सी सेवा मिळू शकेल, असे रेल्वेने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

Pune Crime: जुन्नर शहरात पहाटेच्या वेळी महिला चोरांच्या टोळीचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं!

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

Gas supply: महाराष्ट्रात LPG कोट्यात 20% वाढ! छगन भुजबलांची मोठी घोषणा; मात्र एक अटही लागू होणार, कोणती अन् कधीपासून?

Ahilyanagar Gas Shortage: एक लाख ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत; अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज २५ हजार सिलिंडरचे वाटप, हाॅटेल, रेस्टॉरंट उद्योगांना मर्यादा!

SCROLL FOR NEXT