होरपळून ७२ वर्षीय वृद्धेचा मृत्यू
गोरेगावमधील २४ मजली इमारतीला भीषण आग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : गोरेगाव पूर्व येथील ‘लक्ष्य चंडी’ या २४ मजली उत्तुंग इमारतीला रविवारी (ता. २२) सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, अग्निशमन दलाने ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
गोकुळधाम कॉलनीतील कृष्णा वाटिका मार्ग, जिल्हा न्यायालयाजवळ असलेल्या लक्ष्य चंडी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर रविवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला ही आग लेव्हल एकची असल्याचे सांगण्यात आले; मात्र आगीचे गांभीर्य पाहून रात्री ८:२५ वाजता अग्निशमन दलाने ही आग ‘लेव्हल-२’ची घोषित केली. आग लागल्यानंतर इमारतीत धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य राबवून सहाव्या मजल्यावरून ७२ वर्षीय इंदू तारकेश्वर सिंह यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यानंतर त्यांना गोरेगाव येथील लाइफ लाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, आगीच्या कारणाचा अधिक तपास पोलिस आणि अग्निशमन दल करत आहेत.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.